Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: देसी जुगाड! ३ किलो मीटर अंतर वाचवण्यासाठी बांबूवरून चालवली कार; पाहा video

Viral News: आजकाल प्रत्येक जण कामात खूप व्यस्थ असतात. त्यामुळे अनेक गोष्टी शॉर्ट कट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक काम पटकन व्हावे यासाठी लोक शॉर्ट कट मार्ग निवडतात. अनेक जुगाड करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Desi Juggad Viral Video:

आजकाल प्रत्येक जण कामात खूप व्यस्थ असतात. त्यामुळे अनेक गोष्टी शॉर्ट कट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक काम पटकन व्हावे यासाठी लोक खूप छोटा मार्ग निवडतात. अनेक जुगाड करतात. मात्र, हा जुगाड अनेकदा फोल जातो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वाहनचालकाने चक्क दोन बांबूवरुन व्हॅन दुसऱ्या बाजूला नेली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल हेत आहे. यात एका वॅन चालकाने वेळ वाचवण्यासाठी शॉर्ट कट मार्ग निवडला आहे. व्हिडिओत एक व्हॅनचालक चक्क दोन लाकडावरुन कार चालवत आहे. ही व्हॅन ज्या रस्त्यावरुन जाते त्याच्याखाली एक मोठा खड्डा दिसत आहे. खड्डा खूप खोल आहे. त्यामुळे या खड्ड्यावरुन जाण्यासाठी दोन लाकडाचे बांबू दोन्ही बाजूने लावण्यात आले आहे. यावरुन प्रवास करणे खूप जास्त असुरक्षित आहे. परंतु या व्हॅनचालकाने धाडस करत हा प्रवास पूर्ण केला आहे. भावा ऐक, एक शॉर्टकट सापडला आहे. ३ किमी अंतराचा प्रवास वाचेल. थोडा लहान आहे पण आपण सोप्या पद्धतीने जाऊ असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

Godman Chikna या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत एक माणूस व्हॅन चालवत आहे तर दुसरा माणूस व्हॅन खाली तर पडत नाही ना हे पाहत आहे. व्हिडिओ पाहताना असे वाटते की, व्हॅन मध्येच खाली पडेन. परंतु चालकाने अगदी व्यवस्थितपणे कार दुसऱ्या बाजूला आणली. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या व्हिडिओला पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केल्या आहेत तर अनेकांनी चालकाचे कौतुक केले आहे. 'हीच ती फास्ट सिरीजवाली व्हॅन', 'स्टंट आहे भावा' अशा कमेट्स आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT