Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

दहिफळ गावातील शालेय मुलांनी सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक केली. रस्ता नसल्याने संतप्त मुलांनी आंदोलन करत व्हिडिओ व्हायरल केला असून ग्रामविकासाच्या समस्या अधोरेखित झाल्या आहेत.

Manasvi Choudhary

शेवगाव तालुक्यातील दहिफळ गावातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील लहान मुलांनी सरपंचाच्या चारचाकी वाहनावर चिखलफेक केला आहे. सोशल मीडियावर याचदरम्यानचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेमकं या लहान मुलांना असं का केलं आहे असा प्रश्न समोर उपस्थिक झाला आहे.

शेवगावातील दहिफळ गावात लहान मुलांना सरपंच महिलेच्या गाडीवर चिखलफेक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दहा ते पंधरा लहान मुले दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या कारभोवती ही लहान मुले दिसत आहे. दरम्यान गावाच्या वेशीवर संरपच महिला कारमध्ये दिसताच या मुलांनी कारवर चिखल उडवला आहे. 'सरपंच खाली उतरा' असं ही मुले ओरडताना दिसत आहे. अनेक मुलांच्या हातात शाळेच्या बॅगा दिसत आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील दहिफळ गावात शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही आहे. अनेक वर्ष मागणी करून देखील या गावात रस्ता नाही आहे. गावातून शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने या मुलांना चिखलातून पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून ही मुले दररोज शाळेत जातात. म्हणूनच या संतप्त झालेल्या लहान मुलांनी सरपंच महिलेच्या चारचाकी वाहनावर चिखलफेक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT