Barber Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Barber Viral Video: सलूनवाल्याचं किळसवाणं कृत्य; कापलेले केस भाजीमध्ये टाकून खाल्ले, Video व्हायरल

सलूनवाल्याने ग्राहकाचे केस कापून चक्क भाजीमध्ये टाकून खाल्ले, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहणाऱ्यांना धक्का बसला आहे. नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही चांगले असतात तर काही वाईट. काही व्हिडीओ पाहून आपण देखील विचार करू शकत नाही की कोणी असं करेल का? सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण काहीही कृत्य करतात. सध्या असाच एक केस कापणारा सलूनवाल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलूनवाल्याने जे केलं आहे ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल.

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा कोणीही विचार करू शकत नाही. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक केस कापणारा सलूनवाला हा ग्राहकाचे केस कापून खाताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे.

या सलूनवाल्याने ग्राहकाचे केस कापून ते ताटात घेऊन खाल्ले आहे. तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती केस कापण्यासाठी सलूनमध्ये बसलेला दिसत आहे. सलूनवाला त्या व्यक्तीचे केस कापताना दिसतो आहे. त्यासलूनवाल्याच्या हातात जेवणाचे ताट दिसत आहे. दरम्यान ग्राहकाचे कापलेले केस त्याने अलू मटरच्या भाजीमध्ये टाकून खाताना दिसतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

@KequeMage या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

ठाकरे बंधूंसाेबत युती नको? काँग्रेस बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी|VIDEO

कोणत्या पुलाखालून जायचंय? कुठे घ्यायचा टर्न, Mappls सुचवेल योग्य रस्ता; Google Maps देणार टक्कर

Health Tips: झोप लागली नाही तर शरीरात काय परिणाम होतात?

Diwali Trip Near Pune: दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचीये? मग पुण्यातल्या या पिकनिक स्पॉट्सला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT