Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तक्रार देताच वाद पेटला; पोलिस ठाण्यातच महिलांची हाणामारी

Women Fighting Video: महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नागरिकांनी अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. तुम्हीही व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

सोशल मीडियावर महिलांच्या हाणामारीचे आणि भांडणाचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र सध्या व्हायरल झालेला व्हिडिओमध्ये पोलीस ठाण्यातच महिलांमध्ये जोरदार राडा झालेला आहे. किरकोळ वादातून सुरू झालेली वादावादी थेट हाणामारीवर आली. एकमेकींवर आरडा-ओरडा करत मारहाण करण्याचा प्रकार घडला. पोलिसांसमोरच चाललेल्या या गोंधळामुळे क्षणभर पोलीसही गोंधळून गेले.

हाणामारीचे नेमके कारण तरी काय?

इचलकरंजी इथं आर्थिक देवघेवीवरून महिलांनी थेट गावभाग पोलीस ठाण्यात गोंधळ घालत आल्या. तक्रार देत असताना महिला समोरासमोर आल्यावर वाद एवढा वाढला की महिलांनी चक्क हात चप्पल घेऊन पद्मजा इंगवले या महिलेवर धाव घेत मारहाण (Fighting)करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान पद्मजा इंगवले यांच्यावर सुदर्शना उर्फ गंगा कांबळे यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पद्मजा इंगवले यांच्यावर खाजगी सावकारी, जातीवाचक शिवीगाळ करणे दागिने लुबाडणे याप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी काल महिला गावभाग पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यावेळी हा वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

हा व्हिडिओ (Video) सध्या युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण झालेला असून प्रत्येक लोकांनी यावर विविध प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''महिलांचे वाद आता जास्त दिसून येतात'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''कहरच झाला'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT