Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Mumbai Local Video: मुंबई लोकलमध्ये महिलांचा राडा! झिंझ्या पकडत तुंबळ हाणामारी, VIDEO व्हायरल

Local Train Viral Video: सध्या लोकल ट्रेनमधील एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत महिला प्रवाशांमध्ये हाणामारी झालेली आहे, ज्याचे कारण एकदा नक्की व्हिडिओत पहा.

Tanvi Pol

Women Fight In local: मुंबई लोकल ट्रेनला मुबंईची लाईफनाईन असे म्हटले जाते. एका दिवसाने जरी लोकल ट्रेन विस्कळीत झाली तरी अनेक लाखो प्रवाशांचे मोठे हाल होतात. प्रवाशांनी गर्दीमुळे चर्चेत असलेली मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी लोकलच्या दरवाज्यातील तरुणांची स्टंटबाजी तर कधी प्रवाशांची हाणामारी.

सध्या पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील(Local Train) एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. ज्या व्हिडिओत काही महिलांची तूफान हाणामारी आणि राग पाहून प्रत्येकाला धडकी नक्कीच भरेल. व्हायरल होत असलेला हाणामारीचा व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा नक्की चूक कोणाची आहे.

नेमके घडलं तरी काय?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला, मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यामध्ये मोठी गर्दी दिसत आहे. मात्र अशातच महिलांच्या डब्यामध्ये काही महिलांमध्ये वाद होण्यास सुरुवात होते,काही वेळाने हे वाद चक्क जोरदार हाणामारीमध्ये बदलतात. महिलांच्या डब्यामध्ये होत असलेली हाणामारी दोन महिलांमध्ये रंगली आहे,काही वेळानंतर मारामारी करत असलेल्या महिलांनी तेथिल अन्य महिला थांबवताना दिसत आहेत. पंरतू महिलांच्या डब्यामध्ये एकीने संपूर्ण मारामारी आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेली आहे.

महिलांच्या हाणामाराची व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या ''patlancha_nianad'' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर कॅप्शनमध्ये,''घरच्या जबाबदाऱ्या पार पाडून लोकल प्रवासात त्याच जोशाने सामोरे जाणं साधी गोष्ट नाही, यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते.ही तपश्चर्या केली तर कुरुक्षेत्रावर विजय नक्कीच मिळणार'', असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओला नेटकऱ्यांनी असंख्य लाईक्स दिलेले आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ विरार लोकलमधील असल्याचे समजत असून व्हिडिओतील मारामारी पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''बघ्यांची भुमीका घेणार्यांनी हे तुमच्या सोबत ही घडू शकते सावध राहा एक जूटीने रहा'',तर दुसऱ्या एका यूजरने कमेट केली,''काय पण म्हणा ज्या महिलेने केस पकडून मारत आहे ती मारामारी मध्ये जबरदस्त आहे बिचाऱ्या महिलेलाला दुसऱ्या महिलांनी सोडवायला पाहिजे होत'',अशा बऱ्याच प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

SCROLL FOR NEXT