Manasvi Choudhary
केस गळती, केस तुटणे आणि केसांत कोंडा होणे या समस्येने महिलांसह पुरूषदेखील त्रस्त झाले आहेत.
या समस्यांवर उपाय म्हणून तुम्ही केमिकल प्रोडक्ट्स वापरत असाल तर वेळीच थांबा यामुळे केस खराब होण्याची शक्यता अधिक आहे.
केसांच्या वाढीसाठी तुम्ही घरगुती टिप्स फॉलो करा. दही हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे.
दही हेअर मास्क केसांना लावल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची वाढ होते.
केसांना दही लावल्याने केस मऊ होतात आणि चमकतात.
दह्यातील लॅक्टिक अॅसिड टाळूवरील मृत त्वचेच्या पेशी नष्ट करते यामुळे केसांची वाढ मुळांपासून होते. केसांत कोंडा आणि बुरशी जन्य संसर्ग झाला असेल तर केसांना दहीचा मास्क लावा.
केसांसाठी दही हेअमास्क बनवण्यासाठी दही आणि कोरफड जेल हे दोन्ही एकत्र मिक्स करा.
दही, मध आणि लिंबू हे एकत्र मिक्स करून तुम्ही केसांसाठी हेअरमास्क बनवा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.