Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मंदिर आहे की आखाडा? भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; घटना CCTV मध्ये कैद

Shocking Temple Video: सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत एका मंदिरात आलेल्या काही भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये हाणामारी झालीये.

Tanvi Pol

Temple Clash Video: जगभरातील अनेक भाविक दरदिवशी मथुरामध्ये पर्यटनासाठी येत असतात.सोशल मीडियावर तेथील अनोख्या गोष्टींचे व्हिडिओ शेअर करत असतात,मात्र सध्याचा मथुरामधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात मथुरेमधील एका मंदिरात भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झालेली आहे.जो व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेला व्हिडिओ मथुरेमधील बांके बिहारी मंदिरातील असल्याचे सांगितले जात आहे,मात्र आम्ही याची पुष्टी करत नाही.ज्या मंदिरात प्रसादा अर्पण करण्यावरुन हाणामारी झाली असल्याचे समजते.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण घडलेली घटना पाहण्यासाठी मिळत आहे.

मंदिरातील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या व्हायरल होत असून एक्सवरील @SachinGuptaUP या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नक्की कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या चांगलाच नेटकरी वर्गात चर्चेत आलेला आहे.

हाणामारीचा (Fighting)व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.त्यातील व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये एका यूजरने कमेंट केली आहे,''हे खूप वाईट झाले'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''धार्मिक स्थळी तरी हाणामारी नको'' तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''नक्की कोणाची चूक आहे''अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा कार्यकर्त्याचा पार्थिव अहमदपूरमध्ये दाखल, परिसरात हळहळ

VI 5G Plan: व्होडाफोन आयडियाचा ५जी प्लॅन, किंमत किती आणि डेटा फायदे काय?

Gauri Pujan 2025 : गौरी पूजनाचे नियम; कोणत्या नक्षत्रावेळी काय करावे हे जाणून घ्या

पितृपक्षात 'या' गोष्टी दिसणं मानलं जातं शुभं

Maratha Reservation: मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांनी फडकवला भगवा झेंडा|VIDEO

SCROLL FOR NEXT