Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग! पेट्रोल पंपावर गॅस भरायला गेला अन् डोळा गमावला, पुण्यातील धक्कादायक VIDEO

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पेट्रोल पंपावरील गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे.

Siddhi Hande

सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा पेट्रोल पंपावर खूप अपघात होतात. पेट्रोल पंपावर फोन वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. तरीही अनेकजण मोबाईल वापरतात. त्यामुळे अनेक दुर्घटना होतात. कित्येकदा तर बाईकला आगदेखील लागली आहे. परंतु नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पेट्रोल पंपावरील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात मोबाईलच्या वापरामुळे नाही तर निष्काळजीपणामुळे एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागला आहे. (Viral Video)

पुण्यात एका पेट्रोल पंपावर सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल उडून एक कर्मचाऱ्याला लागले. त्यामुळे त्याला स्वतः चा डोळा गमवावा लागला आहे. हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर ही घटना घडली आहे. (Viral News)

निष्काळजीपणामुळे एका कर्मचाऱ्याला स्वतः चा डोळा गमवावा लागला आहे. त्यामुळे नेहमी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी भरताना काळजी घ्यायची आहे. याप्रकरणी पंप मालक धैर्यशील पानसरेआणि राहित हरकुर्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील या घटनेत हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) या कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद हा पेट्रोल पंपावर कामाला होता. रविवारी संध्याकाळी तो एका दुचाकीमध्ये गॅस भरत होता.यावेळी अचानक गॅसचे नोझल त्याच्या तोंडावर उडाले. यामध्ये त्यांच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. दुर्दैवाने त्याला आपला डोळा गमवावा लागला आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

पेट्रोल पंपावर गॅस भरताना नेहमी काळजी घ्यायची असते. काही सूचनांचे पालन करायचे असते. अनेकदा पेट्रोल पंपावर मोबाईल वापरल्यामुळे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. एकदा बाईकला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे सर्वांनी पेट्रोल भरताना काळजी घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुलीकडून पैशांसाठी तगादा, ७ दिवसांपासून बेपत्ता; टिटवाळ्यातील वयोवृद्ध दांपत्यासोबत काय घडलं? आत्महत्या की घातपात?

भयंकर! धावत्या लोकलमध्ये प्रवाशावर चाकू हल्ला, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Maharashtra News Live Update: बागेश्वर महाराजांविरुद्ध भंडाऱ्यात काँग्रेसचं जोडेमारो आंदोलन

Marathi Actor On Manohar Mama: भोंदू मनोहर मामाचं मराठी टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन? या मराठमोळ्या अभिनेत्याने केला मोठा आरोप

Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT