Grandfather Climbs Fort Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Grandfather Climbs Fort Video: ८६ वर्षीय आजोबांनी एका दमात सर केला १४०० मीटर उंच रायरेश्वर किल्ला, शिवरायांच्या मावळ्याचा VIDEO VIRAL

86 Year Old Grandfather Climbs fort : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतली तरी खूप अभिमान वाटतो. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ले सर करण्यात वेगळाच आनंद असतो. एका ८६ वर्षीय आजोबांनी एका दमात रायरेश्वर किल्ला सर केला आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.महाराष्ट्रात शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना भेट द्यायला देशविदेशातील पर्यटक येतात. या गडकिल्ल्यांवर अनेक लोक ट्रेक करतात. लहानांपासून ते अगदी वयोवृद्ध लोक या ठिकाणी ट्रेक करतात. गडकिल्ल्यांवरील ट्रेकिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.असाच एक ८६ वर्षीय आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

८६ वर्षीय आजोबांनी रायरेश्वर किल्ला मोठ्या उत्साहात सर केला आहे. वय विसरुन या आजोबांनी हा किल्ला चढला आहे. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह या आजोबांमध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे त्यांचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. पांढऱ्या रंगाचा सदरा आणि धोतर नेसून या आजोबांनी हा किल्ला चढला आहे. या आजोबांनी तरुणांना लाजवेल अशा उत्साहात गर सर केला आहे. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत आजोबा किल्ला चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा तरुण आजोबांना विचारतो की, तुमचे वय काय ओ आजोबा? त्यावर आजोबा म्हणतात की, '८६'. यावर तो तरुण म्हणतो की, ८६ वय आहे तरीपण तुम्ही चढताय.त्यावर आजोबा म्हणतात, तरीपण चढायचं. त्यावर तरुण आजोबांना विचारतो की, आम्ही ८६ वयापर्यंत चढू काय? त्यावर आजोबा म्हणतात की, मेहनत केली की चढणार, बालपणीपासून आम्ही १००-१०० बैठक काढायचो. त्यामुळे आम्ही अजूनही गड चढू शकतो. आजोबांचा हा उत्साह पाहून आजूबाजूचे सर्व तरुण तरुणी भारावून जातात. आजोबांची ही ऊर्जा पाहून तुम्हालादेखील खूप चांगले वाटेल, स्फूर्ती येईल. आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

sahya.veda या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'एवढी स्फूर्ती पाहून सर्वांनाच अभिमान वाटेल'.'खूप खूप छान वाटलं बाबा तुमच्या संस्कारात मोठे झालोय आम्ही मला खूप अभिमान आहे तुम्ही माझ्या जन्मदात्री चे वडील आहात आणि माझे बाबा', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT