Grandfather Exercising Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Grandfather Fitness Video: वय तर फक्त आकडा! ७० वर्षांच्या आजोबांचा फिटनेस बघा, जीमला जाणारे तरूण बघतच राहतील

Grandfather Exercising Video: अनेक तरूण बॉडी बनवण्यासाठी जिममध्ये घाम गाळतात. अशाच तरूणाच्या फिटनेसला लाजवेल अशा एका आजोबांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

Priya More

Viral Video:

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेकांना शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तंदुरूस्त राहण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला वारंवार डॉक्टरांकडून आणि तज्ज्ञांकडून दिला जातो. पण बऱ्याचदा वेळ मिळत नाही अशी कारणं देऊन व्यायाम करण्यासाठी टाळाटाळ केली जाते.

अनेक तरूण बॉडी बनवण्यासाठी जिममध्ये घाम गाळतात. अशाच तरूणाच्या फिटनेसला लाजवेल अशा एका आजोबांचा व्हिडीओ सध्या (Grandfather Fitness Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले आजोबा उद्यानामध्ये असलेल्या रेलिंगवर व्यायाम करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या आजोबांचा हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी 'रामायण' या प्रसिद्ध मालिकेतील लक्ष्मण म्हणजेच सुनिल लहरी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या आजोबांचा फिटनेस पाहून सुनिल लहरी देखील हादरले. या वयामध्ये फिटनेसची आवड असणारे हे आजोबा पाहून सुनिल लहरींसोबत अनेकांना देखील आश्चर्य वाटत आहे.

साठी काय पन्नाशी पार केल्यानंतर अनेक जण गुडघे दुखी, कंबर दुखीमुळे हैराण असतात. या दुखण्यांमुळे अनेक जण बिछाण्यालाच खिळून राहतात. या वयामध्ये अनेकांना व्यवस्थित चालता देखील येत नाही. अनेकदा ते घराबाहेर देखील पडत नाहीत. एका जागेवर बसून राहणे ते पसंत करतात. अशामध्ये या ७० वर्षांच्या आजोबांचा हा व्हिडीओ सर्वांसमोर नवा आदर्श निर्माण करत आहेत. आजोबांच्या या धडाडी व्यायाम प्रकार पाहून तरुणांना देखील लाज वाटेल.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका उद्यानामध्ये पांढऱ्या रंगाचा टीशर्ट, शॉर्ट्स आणि पायात शूज घातलेले एक आजोबा व्यायाम करत आहेत. दोन रेलिंगवर ते व्यायाम प्रकार करत आहेत. वर-खाली उड्या मारून ते वेगवेगळा व्यायम प्रकार करताना दिसत आहेत. आजोबांचा हा जोश पाहून भल्याभल्यांची बोलतीच बंद झाली आहे. उद्यानामध्ये आलेले काही तरूण आजोबांचा हा व्यायाम प्रकार निरखून बघताना दिसत आहेत.

सुनिल लहरी यांनी आजोबांचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये '७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी वय ही फक्त एक संख्या आहे अशी भावना असली पाहिजे. प्रत्येक वयात आपण आपल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायला पाहिजे.' आजोबांच्या या व्हिडीओला नेटिझन्सनी चांगली पसंती दिली आहे. ते हा व्हिडीओ शेअर देखील करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. आजोबांचे व्यायामाप्रती असलेले प्रेम आणि फिट राहण्यासाठी घेतलेली मेहनत आणि जिद्द पाहून सध्या सोशल मीडियावर अनेक जण त्यांचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नरेश अरोरा यांच्या कारवाईवर सुनिल तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये पुन्हा मोठा राडा; भाजप उमेदवाराच्या समोरच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला? व्हिडिओ व्हायरल

आम्ही राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पाठिशी; क्राइम ब्रांचच्या कारवाईनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Vijay Hazare Trophy: सेमीफायनमध्ये या ४ टीम्सने मारली दणक्यात एन्ट्री; पाहा कुठे आणि कधी रंगणार सामने

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला करा विशेष उपाय; संकटं, अडथळे, पैशांची तंगी, अडचणी होतील दूर

SCROLL FOR NEXT