Mumbai Local Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Video : "सासूबाईंनी लावली शेंडी..." लोकलमध्ये महिलांचा भन्नाट डान्स; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमधील महिलांच्या डब्यात ‘सासूबाईंनी शेंडी लावली’ या गाण्यावर महिलांनी केलेला भन्नाट डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Alisha Khedekar

  • मुंबई लोकलमध्ये महिलांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

  • ‘सासूबाईंनी शेंडी लावली’ गाण्यावर ठेका

  • सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक

  • प्रवासातच मनोरंजनाचा अनोखा अनुभव

Mumbai Viral Video News मुंबई लोकल ही प्रवाशांच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग बनली आहे. लोकल ही प्रवास करण्यासाठी असलेलं उत्तम स्रोत आहे. या लोकलमध्ये कधी राडा होतो तर, कधी मनोरंजन. सकाळी कामावर जाताना प्रवासी धावपळीमधून थोडासा वेळ काढत गाणी, भजनाचे कार्यक्रम अगदी तालासुरात करतात. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. अशातच आता ट्रेनच्या महिलांच्या डब्यामधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिलांनी 'सासूबाईंनी शेंडी लावली' या गाण्यावर ठेका धरला.

चूल आणि मूल सांभाळत स्त्रियांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. काही महिला दररोजच्या धावपळीतून स्वतःला वेळ देणं विसरतात, तर काही मिळालेला वेळ सार्थकी लावतात. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला लोकलमध्ये दिवसभराचा थकवा विसरून मराठी गाण्यावर नृत्य करताना पाहायला मिळत आहेत. सासूबाईने लावली शेंडी या गाण्याच्या बोलावर सुंदर हावभाव, एखाद्या नर्तिकेला लाजवेल अशे ठुमके देत या महिलांनी ठेका धरला. हा व्हिडिओ savantvibhuti911 या इंस्टाग्राम चॅनलवरून शेअर करण्यात आलं आहे.

हे भन्नाट नृत्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रीलवर अनेक नेटकऱ्यांनी महिलांच्या आत्मविश्वासाबद्दल कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी या रीलवर कमेंट करत लोकलच्या गर्दीबाबत विचारणा केली आहे. तसेच एकाने मजेशीर कमेंट करत म्हटलं आहे की, यांच्या कडून अधिकच तिकीट रेल्वेने घ्यायला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT