Viral video Saam T
व्हायरल न्यूज

King Cobra Viral Video: माकडाचे माकडचाळे पाहून किंग कोब्रा थेट उभा राहिला; पुढे जे घडलं ते भयंकरच...

Ruchika Jadhav

Animal Viral Video: माकड म्हणजे सगळ्यात खट्याळ प्राणी. माणसाला देखील रडू कोसळेल अशा या माकडाच्या अनेक करामती चर्चेत आहेत. माकडाचे आजवर बरेच व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. माकड अगदी जंगलाचा राजा असलेल्या वाघ किंवा चीता सोबत देखील पंगा घेतं. अशात आता या माकडाने प्रचंड विषारी असलेल्या किंग कोब्रा सोबत पंगा घेतला आहे. (Latest Viral Video)

सोशल मीडियावर सध्या माकड आणि किंग कोब्रा यांचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये माकडाने किंग कोब्राला पार रडकुंडीला आणलं आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की किंग कोब्रा आपला लांब आणि भलामोठा फणा काढून उभा आहे. त्याला पाहून माकडाने जराही भीती दाखवली नाही. उलट माकडाने त्याच्याशी खट्याळ मस्ती करायला सुरुवात केली आहे.

माकड या किंग कोब्राची शेपटी खेचत आहे. माकडाने हात लावताच किंग कोब्रा फना काढून उभा राहिला आहे. माकड जसा स्पर्श करतो तितक्यात किंग कोब्रा त्याला दंश करतो. त्याच्या दांशाने माकड जराही घाबरत नाही. पहिल्यांदा दंश केल्यावर माकड त्याला लगेच हुकवतो. तसेच नंतर पुन्हा एकदा किंग कोब्राची शेपटी खेचून त्याला दुसरीकडे खेचून आणतो.

@shnoyakam या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताच 66 लाखांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिला आहे तर 2 लाखांहून अधिक लाइक्स या व्हिडिओला मिळाले आहेत.

व्हिडीओ पाहून नेट कऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्या आहेत. काहींनी मकडासाठी काळजी व्यक्त केली आहे. तर काहींनी साप विषारी असतो हे माकडाला माहिती नाही असं म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

Shukra Nakshatra Gochar: शुक्र ग्रहाने नक्षत्रामध्ये केला बदल; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Politics: हरियाणाची पुनरावृत्ती होणार, राज्यात महायुतीचे सरकार येणार: CM एकनाथ शिंदेंना विश्वास

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे! 'या' जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD कडून यलो अलर्ट जारी; वाचा आजचे हवामान

SCROLL FOR NEXT