Gujrat Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : तरुणांना स्टंटबाजी करणं भोवल; महागडी गाडी समुदकिनारी घेऊन गेले अन् काय घडले ते पहा

Gujrat Beach : सुरतमधील डुमास बीचवर काही तरुण मुलांना स्टंटबाजी भोवली आहे. महागडी कार समुद्रकिनारी घेऊन गेल्याने ती दलदलीत अडकली. त्यामुळे गाडी क्रेनने बाहेर काढावी लागली.

Alisha Khedekar

गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुरतमधील डुमास बीचवर काही श्रीमंत बापाच्या मुलांना स्टंटबाजी अंगलट आली आहे. समुद्रावर वाहने घेऊन जाणे बंधनकारक असताना काही तरुण मंडळी मर्सिडीज घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. या दरम्यान त्यांची गाडी समुद्रकिनारी असलेल्या दलदलीच्या जमिनीत अडकली. ती काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली असल्याचं समोर आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन मुले समुद्रकिनाऱ्यावर अडकलेली मर्सिडीज बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तपासात ही व्हिडिओ सुरतमधील डुमास बीचचा असल्याचे समोर आले आहे. ही मुले स्टंट आणि रीलसाठी मर्सिडीज घेऊन समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. या दरम्यान, मर्सिडीज समुद्रकिनाऱ्यावरील दलदलीच्या जमिनीत अडकली.

व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एक महागडी मर्सिडीज कार समुद्राच्या पाण्यात कशी अडकली आहे, जी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खूप प्रयत्न करूनही गाडी बाहेर काढता आली नाही, म्हणून ती बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. डुमास बीचवर गाड्या अडकल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यानंतरच समुद्रकिनाऱ्यावर गाड्या नेण्यावर बंदी घालण्यात आली. या घटनेनंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, डुमास बीचवर वाहने नेण्यास बंदी असताना, ही मुले मर्सिडीज घेऊन तिथे कशी पोहोचली?

सुरत पोलिसांनी या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून अशा परिस्थितीत पोलिसांच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत की मर्सिडीज नेण्याची परवानगी कोणाकडे होती? त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर गस्त नव्हती का ? सुरतमध्ये अशाप्रकराची श्रीमंत मुलांची मनमानी दुसऱ्यांदा समोर आली आहे . यापूर्वी, मुले शाळेच्या निरोप समारंभात आलिशान गाड्या घेऊन आली होती आणि नंतर त्यांनी ड्रोन उडवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करून गोंधळ घातला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT