Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : भाऊ होते म्हणून मॅटर संपला; २० ते २५ कुत्र्यांची सोडवली भांडणं, VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल

Viral Video : आपण माणसांशी जसा संवाद साधतो त्या पद्धतीने हा व्यक्ती सुद्धा येथील कुत्र्यांशी संवाद साधतो.

Ruchika Jadhav

रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे फार घातक असतात. यांचा स्वत:चा एक खास परिसर असतो. या परिसरात त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुत्रे आले की सर्वजण त्याच्यावर भुंकू लागतात. तुम्ही देखील रस्त्यावर एकाचवेळी २० ते २५ कुत्र्यांच्या टोळक्याची भांडणे पाहिली असतील. कोणी कितीही धीट मनाचे असले तरी या भांडणात कोणीही पडत नाही. मात्र सोशल मीडियावर अशीच कुत्र्यांची भांडणे सोडवतानाचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर साधारण २० ते २५ कुत्रे मोठमोठ्याने एकमेकांवर भुंकत आहेत. ही झुंबड पाहून रत्यावरील व्यक्ती सुद्धा घाबरल्यात. या रस्त्यावरून जाण्यासाठी सर्व जण घाबरत आहेत. त्यामुळे कुत्र्यांची भांडणे सोडवणे हा एकच पर्याय उरला आहे. अशात एक व्यक्ती कुत्र्यांची भांडणे सोडवण्यासाठी थेट या झुंड जवळ येऊन उभा राहतो.

आपण माणसांशी जसा संवाद साधतो त्या पद्धतीने हा व्यक्ती सुद्धा येथील कुत्र्यांशी संवाद साधतो. शांत रहा, भांडू नका. होत राहतात चूका आपण माफ करायचं, असं हा व्यक्ती येथील कुत्र्यांना सांगतो. त्यांची ही वाक्ये ऐकून सर्व कुत्रे एखाद्या शहाण्या माणसाप्रमाणे येथून निघून जातात. आता हा सर्व प्रताप दुसऱ्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे.

कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. प्राण्यांवर माय आणि प्रेम केले की ते आपली भाषा समजू लागतात असं म्हणतात. ज्या व्यक्ती आपल्या घरात कुत्रे पाळतात ते सुद्धा त्यांना आपल्या भाषेत विविध गोष्टींचे ज्ञान देत असतात. मात्र रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांचे जरा वेगळेच असते. त्यामुळे अशा कुत्र्यांपासून आपल्याला धोका सुद्धा असतो. कुत्र्यांची भांडणे सुरू असताना ते फार आक्रमक असतात. अशा परिस्थिती त्यांच्याजवळ जाणे म्हणजे स्वत:हून संकटाला आमंत्रण दिल्यासारखे आहे.

मात्र या व्यक्तीने जराही न घाबरता थेट कुत्र्यांजवळ जाऊन त्यांची भांडणे सोडवली आहेत. त्यामुळे या माणसाचा हा मजेशीर व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट्स सुद्धा आल्या आहेत. 'दादा, तुम्ही होते म्हणून हे एवढा मोठा मॅटर इतक्या शांततेत सॉल्व्ह झाला. नाही तर हा राडा खूप मोठा होता. अमरावतीमध्ये करफ्यू लागला असता, पोलीस फोर्स मागवावी लागली असती. कदाचित ते लोण अकोला, विदर्भ, महाराष्ट्र किंवा देश भर ही पसरले असते. तुम्ही वेळेवर भांडण सोडवले, त्यासाठी धन्यवाद, अशी हास्यास्पद कमेंट एकाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Evening Puja Timing: वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी देवपूजा करण्याची वेळ काय?

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराच्या गाडीवर दगडफेक

Sindhudurg Tourism : सिंधुदुर्गमध्ये लपलेला 'हा' समुद्रकिनारा पाहताच मालदीव,थायलंड विसराल

Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

जीवनात शांतता हवीये? पत्नीला चुकूनही बोलू नका 'या' 5 गोष्टी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT