Staying Safe Around Street Dogs : भटक्या कुत्र्यांनी तुमच्यावर हल्ला करू नये म्हणून काय करावे? वाचा महत्वाची माहिती

How to stop a stray dog from attacking you? आज आम्ही तुमच्यासाठी कुत्र्यांपासून आपला जीव कसा वाचवायचा याची माहिती सांगत आहोत. डॉ. निलेश भणगे यांनी याबाबत सविस्तर माहितीसह काही टिप्स दिल्या आहेत.
How to stop a stray dog from attacking you?
Staying Safe Around Street DogsSaam TV
Published On

शहरांसह गावांमध्ये देखील भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे पहाटे आणि रात्रीच्यावेळी तसेच रस्ता शांत असताना बाहेर पडणे कठीण झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर बऱ्याच व्यक्तींना आपला जीव सुद्धा गमवावा लागत आहे. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी कुत्र्यांपासून आपला जीव कसा वाचवायचा याची माहिती सांगत आहोत.

How to stop a stray dog from attacking you?
Stray Dogs Shot: क्रूरतेचा कळस! २० भटक्या कुत्र्यांना गोळ्या घालून केलं ठार; तेलंगणामधील थरारक घटना

डॉ. निलेश भणगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांपासून स्वत:चे रक्षण करणे फार सोपे आहे. त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

रस्त्यावरून जाताना कुत्रे असल्यास काय करावे?

रस्त्यावरून जाताना कुत्रे असल्यास कुत्र्यांच्या जवळून जाताना त्यांना घाबरवू नका. कारण घाबरलेली व्यक्ती पाहून कुत्रे तुमच्यावर हल्ला करू शकतात.

अनोळखी भटक्या कुत्र्यांना खाण्याचे पदार्थ दाखवू नये

अनोळखी भटके कुत्रे कायम भुकेले असतात. त्यामुळे त्यांना खाण्याची कोणतीच गोष्ट दाखवू नका, कारण खाण्यासाठी ते तुमच्यावर हल्ला करू शकतात.

कुत्र्यांच्या पिल्लांना घेताना ही काळजी घ्या

कुत्र्यांच्या पिल्लांजवळ जाताना त्यांची आई कुठे आहे ते आधी पाहा. कारण ती तुमच्यावर हल्ला करू शकते. कुत्र्यांच्या जवळ जाताना त्यांचे कान टवकारलेले आहेत का पाहा. कारण ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. रस्त्यावर कुत्रे असताना त्यांच्या जवळून जाताना त्यांना कोणताही आवाज देऊ नका. कारण ते तुमच्यावर हल्ला करू शकतात.

कुत्र्यांना स्पर्श झाल्यास हल्ल्याची शक्यता

कुत्र्यांजवळून जाताना त्यांना स्पर्श करू नका. कारण ते तुमच्यावर हल्ला करू शकतात.

लहान मुलांची अशी काळजी घ्याल?

परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सुरू असेल तर तुमच्या घरातील लहान मुलांनाची काळजी घ्या. त्यांना एकटं घराबाहेर जाऊ देऊ नका. कुठेही जाताना किंवा मुलं अंगणात खेळत असतील तेव्हा सुद्धा त्यांची काळजी घ्या.

तक्रार कुठे करावी?

परिसरात पिसाळलेले आणि आक्रमक कुत्रे असतील तर संबंधित शहराच्या पालिकेत त्याबाबत तक्रार करा. तुम्हाला परिसरात असे कुत्रे आढळल्यास स्थानिक अधिकाऱ्यांना किंवा प्राणी नियंत्रणास याची माहिती द्या.

लक्षात ठेवा, कुत्र्यांचा उपद्रव रोखणे हा एक सामुदायिक प्रयत्न आहे. अशा पद्धतीने काळजी घेऊन तुम्ही भटक्या कुत्र्यांपासून स्वत:चे रक्षण करू शकता.

How to stop a stray dog from attacking you?
Stray Dog Age : कुत्र्यांचं आयुष्य ४ वर्षांनी घटलं; माणसाशी आहे थेट संबंध? काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com