Machine Fried Rice saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आता 'फ्राईड राईस' नाही तर म्हणा 'मशीन फ्राईड राईस'; मशीन बनवणार राईस

Fried Rice: बाजारात एक नवीन मशीन आलीय, ही मशीन फ्राईड राईस बनवण्यासाठी वापरली जाते. या मशीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल झालेला व्हिडिओ कुठला आहे. याची माहिती मिळालेली नाहीये.

Bharat Jadhav

योगेश गायकवाड, साम प्रतिनिधी

शहरातील प्रत्येक कॉर्नरजवळ चायनीज पदार्थांचा गाडा नक्कीच आढळतो. या गाड्यावरील सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस. भल्या मोठ्या आणि बारीकशा कढाईत राईस टाकून थाड, थाड, असा आवाज करत राईस बनवणारा व्यक्ती तुम्ही नक्कीच पाहिला असेल. तुमची इच्छा नसेल तरी त्या आवाजाने तुमचं लक्ष त्या राईस बनवणाऱ्यांकडे जातं. राईस बनवतांना होणाऱ्या आवाजाने खवय्यांचं लक्ष तिकडे वेधलं जातं. पण बाजारात, अशी मशीन आलीय जी आवाज न करता फ्राईड राईस बनवेल.

भारत हा देश विकसनशील देश म्हणून ओळखला जातो.त्याच भारतीय नागरीकांकडून कोणतीच गोष्ट अशक्य नाही. नवनवीन शोध कार्य करत राहाण्याचा कित्ता भारतीय नागरीक चांगलाच गिरवतात. वेगवेगळी टेक्नाँलॉजी भारतीय विकसीत करत असतात. त्याचंच एक अनोखं उदाहरण म्हणजे ही फ्रईड राईस मशीन. जगात टेक्नाँलॉजी एवढी पुढे गेली आहे की, मनुष्य हा काही पण तयार करु शकतो. आता बाजारात फ्राईड राईस मशीन आली आहे. ही मशीन गरमागरम फ्राईड राईस बनवू शकते. तसेच अंडा राईस सुद्ध बनवू शकते.

ही मशीन फ्राईड राईस कशी बनवते?

ही मशीन चालू केल्यानंतर कढाई गरम होते आणि ती फिरू लागते. त्यांनतर अंडी फोडून त्यात टाकलं जातं. अंडी तळल्यानंतर त्यात राईस टाकला जातो. त्यानंतर राईस आणि अंड्याचं मिश्रण केलं जातं. मग त्यामध्ये इतर पदार्थ टाकून गरमा गरम फ्राईड राईस बनवला जातो. या फ्राईड राईस मशीनची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगत चाललीये. पण घरात हाताने बनवलेल्या फ्राईड राईसची चव चांगली का मशीनमध्ये बनवलेल्या राईसची चवी चांगली हे फ्राईड राईस खाल्यावरंच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT