Bike In Hospital Viral Video: आई वडील आपल्या मुलांसाठी नेहमी कष्ट घेत असतात, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी दिवसरात्र झटत असतात. त्यामुळेच आई वडिलां इतकं प्रेम मुलांवर कोणी करु शकत नाही, म्हणले जाते. सोशल मीडियावरही आई वडिलांच्या प्रेमाचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलाचा पाय फ्रॅक्चर झाल्याने वडिलांनी थेट रुग्णालयात गाडी घातल्याचे दिसत आहे. काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेवू...
सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून अनेकदा आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या अशाच एका बाप- लेकाच्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. हा संपूर्ण प्रकार राजस्थानमधील आहे.
त्याचं झालं असं की, राजस्थानच्या (Rajasthan) कोटामध्ये एका व्यक्तीने आपली स्कूटी थेट हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर नेली आहे. मुलाला चालता येत नसल्याने वकिल बापाने स्कूटी थेट रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर नेली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्यावर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. (Latest Marathi News)
हा संपूर्ण प्रकार गुरूवारी घडल्याचे दिसत आहे. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी व रुग्ण आपापल्या कामात व्यस्त होते. त्याचवेळी दुपारी दीडच्या सुमारास अचानक मनोज जैन हे स्कूटी घेऊन लिफ्टकडे जाऊ लागला. त्यांच्या मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे ते सांगत होते. त्यांनी स्कूटी लिफ्टमध्ये घातली आणि नंतर मुलाला वॉर्डच्या दिशेने घेऊन निघाले. मुलाला स्कूटीवरून वॉर्डात पाहून सगळेच थक्क झाले.
इतकेच नव्हेतर हे प्रकरण थेट कोर्टातही गेले. ज्यामध्ये या वकिलाच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे. रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने हे पाऊल उचलल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video In Marathi)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.