PBKS vs DC Match Cheerleader Video: एकीकडे आयपीएलचे सामने सुरु आहेत आणि दुसरीकडे भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव सुरु आहे. त्यातच काल पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील IPL सामना जम्मू आणि पठाणकोटमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्याने अचानक थांबवण्यात आला. दरम्यान, त्यानंतर घडलेल्या एका प्रसंगामुळे मॅचमधील चीअरगर्लने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तेथील वातावरण किती भीतीदायक असल्याची कल्पना प्रत्येकाला येईल.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात सर्वत्र अवकाळी पावसाने(Rain) हजेरी लावलेली आहे. त्यामुळे बऱ्याचदा आयपीएल सामने उशीराने सुरु होतात तर मध्येच थांबले जातात. मात्र, दिनांक ८ मे रोजी धर्मशाला स्टेडियम पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स होणार हा सामाना पावसामुळे उशिरा सुरु झाला. त्यानंतर लगेच लाईट गेल्याने सामना थांबवण्यात आला आणि स्टेडियममध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. सुरक्षेला प्राधान्य देत खेळाडू आणि प्रेक्षकांना तत्काळ बाहेर काढण्यात आलं. परिस्थिती गंभीर असल्याने तातडीने योग्य ती उपाययोजना करण्यात आली.
त्याचवेळी सर्वजण सुरक्षित ठिकाणी जात असताना मॅचनमधील एका चीअरगर्लने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने तेथील संपूर्ण वातावरण "अत्यंत भीतीदायक" असल्याचे म्हटलं आहे. त्यानंतर BCCI या परिस्थितीवर तोडगा काढत खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्ट क्रू यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे.
चीअरगर्लने हा व्हिडिओ ट्वीटर अर्थात एक्सवरील @OGKnuckletalk या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ काही क्षणात लाखोंच्या संख्येने लोकांनी पाहिला त्यानंतर प्रत्येकजण घाबरलेला आहे तर अन्य माध्यमांवरही हा व्हिडिओ (Video) शेअर करण्यात आलेला आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.