Viral Video  X
व्हायरल न्यूज

AC कोचमधून प्रवास करायची हिंमत कशी होते? ड्युटीवर निघालेल्या जवानांशी माजोरड्या TTE ने घातला वाद अन् नंतर...; पाहा तुम्हीच व्हिडिओ

Viral Video : भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. सुट्टीवर असलेल्या जवानांना ड्युटीवर येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असेच ड्युटीवर जाणाऱ्या काही जवानांसह ट्रेनमध्ये गैरवर्तन झाल्याचे प्रकार समोर आला आहे.

Yash Shirke

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनचा टीटीई भारतीय सेनेतील जवानांशी हुज्जत घालत असल्याचे पाहायला मिळते. ड्युटीवर जाणारे जवान एसी कोचमधून प्रवास करत असल्याने टीटीई या जवानांवर भडकला असल्याचे व्हिडीओत दिसते.

सीमावर्ती भागात गोळीबार, मिसाइल-ड्रोन हल्ले यांमुळे भारत-पाकिस्तान संबंध ताणल्याने सैन्यातील जवानांना लवकरात लवकर कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. आदेशाचे पालन करण्यासाठी जवान सीमेवर जाण्यासाठी घरातून निघाले. पण काही जवानांसोबत गैरव्यवहार झाल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळते.

व्हायरल व्हिडीओमध्ये ट्रेनचा टीटीई १० ते १२ जवानांशी वाद घालत असल्याचे दिसते. ड्युटीवर जाण्यासाठी निघालेले हे जवान ट्रेनच्या टॉयलेटलगतच्या गॅलरीमध्ये बसले होते. 'तुम्हाला इथे कुणी बसायला सांगितले, एसी कोचमध्ये प्रवास करण्यास कुणी परवानगी दिली' असे म्हणत टीटीईने जाब विचारला. आम्ही सीमेवर चाललो आहोत. स्लीपर कोचमध्ये बसायला जागा नाहीये म्हणून एसी कोचच्या गॅलरीत उभे राहून प्रवास करतोय', असे जवानांनी म्हटले. प्रवाशांनी तक्रार केल्याचे कारण देत टीटीई जवानांशी हुज्जत घातल बसला. एका जवानाने टीटीईचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील काही दिवसांपासून तणाव आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट केले. यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने सीमावर्ती भागात गोळीबार केला. मिसाइल्स, ड्रोन यांनी भारतावर हल्ले केले. हे सर्व हल्ले भारताने हाणून पाडले. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना, सैन्यातील अधिकाऱ्यांना ड्युटीवर बोलवण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT