Karnataka Accident Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Karnataka Accident Video: भरधाव कारने आधी बाईकला उडवलं, नंतर तीन शाळकरी मुलींनाही दिली जोरदार धडक; Video पाहून उडेल थरकाप...

Accident Viral Video: भरधाव कारने आधी बाईकला उडवलं, नंतर तीन शाळकरी मुलींनाही दिली जोरदार धडक; Video पाहून उडेल थरकाप...

साम टिव्ही ब्युरो

Karnataka Accident Video: कर्नाटकातील रायचूर येथे एक भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात आलेल्या कारने चार जणांना जोरदार धडक दिली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यात तीन शाळकरी मुली आणि एका तरुणाचा समावेश आहे.

तिघांना गंभीर तर एकाला किरकोळ दुखापत झाली. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये या संपूर्ण अपघाताची घटना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडू शकतो. कारण कारने धडक दिल्यानंतर शाळकरी मुलगी हवेत उडून नंतर दूर पडताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 जुलै रोजी दुपारी ही घटना घडली होती. रस्त्याच्या पलीकडून दुचाकीस्वार यू टर्न घेण्यासाठी दुचाकी वळवताना दिसत आहे. समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला बाजूने जोरदार धडक दिली. कारची धडक लागताच दुचाकी आणि दुचाकीस्वार रस्त्यावर पडताना या व्हिडीओत दिसत आहे. (Latest Marathi News)

व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दुचाकीला धडक दिल्यानंतर तीन मुली रस्त्यावर चालताना असताना त्यांना ही कार धडकते. या कारच्या धडकेत यातील एक मुलगी धडकेनंतर हवेत उडून 20 फूट लांब जाऊन पडते.

या चौघांना धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनास्थळी एकच खळबळ उडाली होती. जखमींच्या मदतीसाठी पादचारी आणि दुकानदार धावून आले होते. तत्काळ सर्व जखमींना उपचारासाठी रायचूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेतील आरोपी कार चालकाला अटक केली होती, तसेच त्याची कार जप्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT