Girl Swallowed By Fish Saam TV
व्हायरल न्यूज

Girl Swallowed By Fish: बापरेबाप! माश्याने मुलीचा हातच खाल्ला; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

Girl Arm Swallowed By Hungry Fish: लहान मुलं देखील आपली हौस भागवण्यासाठी फिशिंग करतात. अशात सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Fish Attack Girl Hand:

नदी किंवा समुद्रातील मासे खाणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत. माश्यांची चव आवडल्याने व्यक्ती नदीवर आणि समुद्रात देखील मासे पकडण्यासाठी जातात. अशात सध्याच्या काळात फिशिंग एक आवड बनली आहे. बऱ्याच व्यक्ती आवड म्हणून देखील मासे पकडण्यासाठी जातात. लहान मुलं देखील आपली हौस भागवण्यासाठी फिशिंग करतात. अशात सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

एक लहान मुलगी समुद्रावर मासे पकडण्यासाठी गेली आहे. मासे पकडताना तिने एक बारीक मासा आपल्या हातात पकडला आहे. मासा हातात पडकून तिने पाण्याजवळ माशांना खाण्यासाठी हातातच धरुन ठेवला होता. माशांना जेवण द्यावं असा विचार या मुलीच्या मनात असावा. मात्र तिच्यासोबत जे घडलंय त्यानंतर ती कधीही माशांना जेवण देणार नाही हे पक्क.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, जेव्हा ती बारीक मासा हातात पकडून असते तेव्हा एक मासा पाण्यातून वर येतो. मात्र ही मुलगी तेव्हा त्याच्याशी मस्ती करते आणि हात मागे करते. माश्याला बारीक मासा खाता येत नाही. नंतर मुलगी पुन्हा आपल्या हातात तो मासा पकडते. यावेळी पाण्यातला मोठा मासा एका क्षणात मोठी झेप घेतो. पाण्यातून वर उसळी घेऊन तो थेट या मुलीचा हातच खातो.

हा प्रसंग घडला तेव्हा मुलगी पुरती भयभीत होते. काय करावं आणि काय नाही हे तिला समजत नाही. ती घाबरून तेथेच जोरजोरात ओरडू लागते. तितक्यात मोठा मासा तिचा हात सोडतो आणि फक्त तिच्या हातातील बारीक मासा घेऊन पाण्यात उडी मारतो.

हा धक्कादाक व्हिडीओ @LADbible या ट्वीटवर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ७ ऑगस्टरोजी त्याने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ९ लाखांहून अधिक लाइक्स आलेत. व्हिडीओपाहून नेटकऱ्यांनी पाण्याच्या ठिकाणी मुलांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT