Pune Crime News: कर्जाची परतफेड न केल्याचा राग, शेजारच्या ४ मुलांना पाण्यात फेकलं; पुण्यातील महिलेला जन्मठेप

Pune Crime News: कर्जाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न केल्याने एका महिलेने शेजारच्या ४ लहान मुलांना पाण्यात फेकल्याची घटना १८ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे शहरात घडली होती.
Pune Women life sentence who killed children by throwing them in water
Pune Women life sentence who killed children by throwing them in water Saam TV
Published On

Pune Crime News: कर्जाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न केल्याने एका महिलेने शेजारच्या ४ लहान मुलांना पाण्यात फेकल्याची घटना १८ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे शहरात घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. पुणे सत्र न्यायालयाने आरोपी महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. हीच शिक्षा आता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सुद्धा कायम ठेवली आहे. (Latest Marathi News)

Pune Women life sentence who killed children by throwing them in water
Sana Khan Case Update: सना खान हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

संगीता असं जन्मठेपेची शिक्षा झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका महिलेने आरोपी संगीताकडून व्याजाने पैसे घेतले होते. फिर्यादी महिलेने वेळेवर पैसे परत न केल्याने संगीताच्या मनात राग होता. १८ नोव्हेंबर २०१० रोजी फिर्यादी महिलेची नातवंडे संगीताच्या घरी टीव्ही बघायला गेली होती.

रोहित (वय ९ वर्ष), राहुल (वय ७ वर्ष), अनमोल (वय ५ वर्ष) व तेजस (वय ३ वर्ष) अशी मुलांची नावे आहेत. दरम्यान, आईक्रीम देत असल्याचे सांगून संगीता चारही मुलांना कॅनलजवळ घेऊन गेली. तेथे तिने सुरुवातीला रोहित आणि राहुलला पाण्यात फेकले (Crime News). अनमोलला पाण्यात फेकत असताना तो संगीताच्या हाताला चावला आणि पळून गेला.

Pune Women life sentence who killed children by throwing them in water
Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

त्याने आरडाओरड करून माणसांना गोळा केले. त्यामुळे रोहित आणि राहुल बचावले, पण ३ वर्षांचा तेजस वाहून गेला. त्याचा मृतदेह दोन दिवसांनी हडपसरला सापडला. याप्रकरणी संगीताविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. मारण्याच्या उद्देशानेच संगीताने मुलांना पाण्यात फेकले होते. तिचे हे कृत्य सबळ पुराव्याने सिद्ध झाले आहे असे निरीक्षण न्यायालयाने निकालात नोंदवले.

न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने लहान मुलांची साक्ष निःसंदेह असल्याचा निर्वाळा दिला. काय साक्ष द्यावी हे मुलांना शिकवले गेले नाही. जी घटना घडली त्याचे वर्णन मुलांनी साक्ष देताना केले आहे. त्यामुळे आरोपी महिला संगीता विलास किवाडेला पुणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा कायम केली जात आहे, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com