Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेम, बाप-लेकीचं! १५ दिवसानंतर बाबा घरी आले, चिमुकलीचा आनंद गगनात मावेना; निरागसतेची नेटकऱ्यांना भुरळ

Father- Daughter Emotional Video: 'प्रत्येक घरात लेक असावीच |हा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुम्हालाही बालपण आठवेल...

Gangappa Pujari

Father Daughter Viral Video: जगातील सर्वात सुंदर नात म्हणजे बाप लेकीचं. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा कोणत्याही हिरो पेक्षा कमी नसतो. आणि बापासाठीही त्याची लाडकी लेक सर्वात प्रिय असते. म्हणूनच प्रत्येक घरात एक लेक असावीच असं म्हणलं जात. मुलीसाठी वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वात महत्वाचा असतो.

सध्या सोशल मीडियावर असाच एक बापलेकीच्या प्रेमाचा सुंदर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा चला जाणून घेवू...

प्रेम बाप- लेकीचं..

सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला असंख्य व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो. तर कधी भावूकही बनवतात. सध्या अशाच एका ह्रदयस्पर्शी व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये एका लहान मुलीचा आणि तिच्या वडिलांच्या प्रेमाचा सुंदर क्षण पाहायला मिळत आहे.

 या व्हिडीओमधील मुलीचा क्यूटनेस तुमचं हृदय जिंकेल यात शंका नाही. असा बाप-लेकीचा व्हिडीओ तुम्ही कधी पाहिलाच नसेल. या व्हिडीओमध्ये दोघांचं नातं पाहून मनं प्रसन्न होऊन जाते. त्यामुळेच सर्वांनाच या गोड चिमुरडीने भुरळ घातली आहे... (Latest Marathi News)

काय आहे व्हिडिओ..

या व्हिडीओमध्ये (Viral Video) एक चिमुकली दिसतेय. तिचे बाबा १५ दिवसांनी घरी आले आहेत. बाबा आले हे पाहून तिचा आनंद गगनात मावेना. बाबांना पाहून तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि बाल अदा इतक्या सुंदर आहेत की, प्रत्येकालाच तिच्या निरागसतेने वेड लावले आहे.

व्हिडिओमधील चिमुरडी बाबा आलेले पाहताच ती चक्क लाजली आणि तोंडावर हात ठेवून खाली वाकली. नंतर तुरुतुरु किचनच्या दिशेने निघाली. या चिमुकलीच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून तुमहालाही तुमचं बालपण नक्की आठवेल.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया...

या व्हिडिओमधील चिमुकलीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी मुलीच्या निरागसतेचे कौतुक केले आहे, तर काही जणांनी बाप लेकीच्या या प्रेमाने मन भरुन आल्याचे सांगितले आहे. घरात लेक असावीच, तिच्यामुळेच घराला शोभा येते... अशाही सुंदर प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. (Father Daughter Heart Touhing Video)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT