Fake God Man Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Video : साधूच्या वेशातला हैवान! रस्त्यावर जाणाऱ्या महिला-मुलींना करायचा नको तो स्पर्श, VIDEO व्हायरल

Fake God Man Viral Video : साधूच्या वेशात महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या बोगस बाबाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

Alisha Khedekar

  • बोगस साधूचा अश्लील व्हिडिओ व्हायरल

  • गर्दीत महिलांशी गैरवर्तन करताना कॅमेऱ्यात कैद

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली

  • पर्यटनस्थळांवरील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

  • सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सध्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे. देव देवतांच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू खरात सारखे आणखी बरेच बाबाबुवा समाजात फिरत आहेत. तसेच अनेक जिल्ह्यातून वासनेच्या नावाखाली नंगानाच करणाऱ्या बाबाबुवांचे घाणेरडं कृत्य समोर येत आहेत. अशातच आता साधूंचा वेश धारण करून गर्दीत फिरणाऱ्या एका बोगस बाबाचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा बाबा गर्दीचा फायदा घेऊन महिलांना अश्लील स्पर्श करताना पाहायला मिळतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोगस साधू राजस्थानमधील जामडोली गावचा रहिवासी असून त्याचे नाव नारायण दास असे आहे. तसेच व्हायरल झालेला व्हिडिओ शिमला येथील एका वर्दळीच्या परिसरातील आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, बोगस साधू बाबा हा रस्त्याने चालताना महिलांना अश्लील स्पर्श करत गर्दीतून चालताना पाहायला मिळतो आहे. त्याच्या मागून चालणाऱ्या एका वाटसरूने हा अश्लील प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी तीव्र टीका केली आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी याची दखल घेत तातडीने या बोगस साधूला बेड्या ठोकल्या आहेत. व्हिडिओ पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी शहराला दिलेल्या भेटींबाबतही अशाच प्रकारच्या तक्रारी आहेत का, याची आता अधिकारी तपासणी करत आहेत. या प्रकरणामुळे गर्दीच्या पर्यटन स्थळांमधील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case: मुंबईतील ज्युनियर कॉलेजच्या मंजुरीसाठी मागितली दीड लाखांची लाच; लिपिकाला ठोकल्या बेड्या, शिक्षण विभागात खळबळ

Shocking: उच्चभ्रू सोसायटीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; ३ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

मालवण-तारकर्ली समुद्रात पुण्याचा पर्यटक बुडाला; एकाला वाचवण्यात यश, एकजण बेपत्ता

Ulhasnagar Crime: उल्हासनगरमध्ये रक्तरंजित थरार! भरचौकात तिघांवर ७ गोळ्या झाडल्या, दोघांचा जागीच मृत्यू

Ebola Virus Alert : इबोला व्हायरसचा धोका, भारतात अलर्ट; ताप आल्यानंतर टेस्ट, हाय रिस्क देशांतून आलेल्या प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी

SCROLL FOR NEXT