Couple Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Couple Viral Video: औरत का चक्कर बाबू भैया! प्रेयसीसाठी तरुणाची स्टंटबाजी; बाहुबली स्टाइल VIDEO तुफान व्हायरल

Viral Video: तरुणीला रस्ता पार करणं जमत नसतं. नदी पार करताना आपण खाली पडू अशी भीती तिच्या मनात सारखी येत होती.

Ruchika Jadhav

Viral Video:

सोशल मीडियावर कपल्सचे आजवर अनेक व्हिडीओ व्हायरल झालेत. आपलं प्रेम किती खरं आहे हे दाखवण्यासाठी काही जण एकापेक्षा एक अतरंगीपणा करतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी बाहुबली सारखा रस्ता तयार केलाय.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रेयसी आणि प्रियकर दोघेही एका नदी जवळ आले आहेत. नदीवर सर्वत्र पाणी आणि काही ठिकाणी मोठी खडकं आहेत. दोघेही फिरत असताना त्यांना समोर एक खड्डा दिसतो. हा खड्डा तरुण सहज ओलांडतो आणि दुसरीकडे जातो.

मात्र तरुणीला रस्ता पार करणं जमत नसतं. नदी पार करताना आपण खाली पडू अशी भीती तिच्या मनात सारखी येत होती. तिने नदी पार करण्याचा प्रयत्न केला मात्र अगदी थोडसं अंतर देखील तिला पार करता येत नव्हतं. पाय घसरून ती खाली पडूनये यासाठी तिचा प्रियकर तिच्यासाठी बाहुबली चित्रपटातील स्टंट करतो.

बाहुबली जसा पाण्यात उतरला होता तसा हा तरुण दोन्ही खडकांवर झोपतो. त्यानंतर तरुणी त्याच्या अंगावर पाय ठेवून खड्डा पार करते. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट केल्यात.

काहींनी या दोघांचं आणि विशेष म्हणजे प्रियकराचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांनी तरुणावर टीकास्त्र सोडलंय. हा सर्व ड्रामा आहे असं काहींनी लिहिलंय. तर आणखीन एकाने लिहिलंय की हे सर्व ठिक आहे पण हा तरुण आता सरळ कसा होणार? नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजीसह हसण्याचे इमोजी पाठवलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT