Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : ही आई आहे की भूत! महिलेचा मेकअप पाहून बाळ रडू लागलं; VIDEO जोरदरा व्हायरल

साम टिव्ही ब्युरो

महिलांसाठी मेकअप म्हणजे अगदी जीव की प्राण. सुंदर दिसण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. काही महिला मेकअपसाठी विविध फेशीअल आणि फेसमास्क लावतात. फेसमास्क लावल्यावर ही व्यक्ती नेमकी कोण आहे हे समजत नाही. महिलांनी अशा पद्धतीने पेसमास्त लावलं की त्यांना लहान मुलं घाबरतात. अशात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने चेहऱ्याला चारकोलमधील फेसमास्क अप्लाय केलं आहे. त्यानंतर तिने आपल्या बाळाला उचलून घेतलंय. आईच्या कुशीत असल्यावर ही आपलीच आई आहे की भूत आहे असं बाळाला वाटत आहे. चेहरा पाहिल्यावर ही आई नसून दुसरंच कोणीतरी असल्याचा विचार त्याच्या मनात येत आहे.

आईने फेसमास्क लावल्याने बाळ आईकडे पाहून मोठ-मोठ्याने रडत आहे. मेकअपसाठी आईने केलेल्या धडपडीमुळे बाळ पूर्णत: घाबरलं आहे. त्याने आईला घट्ट मिठीमारलीये अन् हळूच तो आईकडे पाहत आहे. आईकडे पाहताच बाळ मोठ-मोठ्याने रडत आहे. तर बाळाची ही रिअॅक्शन पाहून आई त्याच्यावर हसताना दिसत आहे.

आई आणि बाळाचा हा व्हिडिओ त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ @tendermomentsguide या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काहींनी व्हिडिओवर खळखळून हसतानाचे इमोजी शेअर केलेत. तर काही व्याक्तींनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे. बाळापेक्षा या आईला तिचा मेकअप महत्वाचा आहे. फेसपॅक लावण्याआधी आपल्या बाळाला संभाळा, अशा पद्धतीच्या कमेंट यावर आल्या आहेत. हसू नका कारण बाळ खरोखर घाबरलं आहे, पालकांनी आपल्या मुलांचे चांगल्या पद्धतीने पालनपोषण केले पाहिजे, असंही एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT