किंग कोब्रा नाग असं नाव जरी ऐकलं तरी अनेक व्यक्ती भयभीत होतात. त्यात आपण ज्या घरात राहतो तिथेच कोब्रा नाग सापडला तर? ही कल्पनाही करवत नाही. मात्र यूपीमध्ये याहूनही एक भयंकर घटना घडली आहे. यामध्ये एका घरात तब्बल १०० किंग कोब्रा नाग सापडले आहेत. त्या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यूपीमधील कुशीनगर जिल्ह्यात एक छोटं गाव आहे. या गावात एका व्यक्तीच्या घरात उंदरांनी येण्याजाण्यासाठी एक बीळ बनवलंय. या बीळात उंदीर असल्याचं त्या घरातील व्यक्तींना माहिती होतं. मात्र एक दिवस अचानक येथून किंग कोब्राचं एक पिल्लू बाहेर पडलं. कोब्राचं पिल्लू पाहून घरातील सर्वजण घाबरले आणि थक्क झाले.
भयभीत होऊन सर्व व्यक्ती घराबाहेर पळाल्या. तर घरातील मोठ्या व्यक्तींनी या पिल्लाला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उंदराने केलेल्या बीळातून आणखी दोन किंग कोब्राची पिल्लं बाहेर आली. बघता बघता एक एक पिल्लू हळूहळू बाहेर पडू लागलं. त्यामुळे गावातील अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे आणि काय नाही कुणालाच काही सुचत नव्हते.
शेवटी गावातील एका सर्प मित्राला ही माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सर्प मित्रानेही घटनास्थळी धाव घेतली. त्याने एक एक करून सर्व पिल्लांना एकत्र एका बकेटमध्ये ठेवले. या पिल्लांची संख्या तब्बल १०० आहे. एवढी जास्त किंग कोब्रा सापाची पिल्ल घरात होती आणि आपण तसेच येथे राहत होतो, असं समजल्यावर येथील कुटुंबातील व्यक्तींच्या मनातील भीती आणखी वाढलीये.
साप पकडल्यावर या घटनेचा व्हिडिओ देखील त्यांनी आपल्या फोनमधील कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. काळजात धडकी भरवणारं हे दृश्य पाहून अनेकांचं मन विचलित झालं आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्यात. काही व्यक्तींनी हे विनाश होण्याचे संकेत असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी पावसात अशा घटना घडतातच असंही म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.