आई ही आईच असते. आईला जगातील सर्वात मोठी योद्धा म्हणतात. आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी आई जीवपणाला लावते. कुठल्याही संकंटाला तोंड देते. मूल आजारी झाल्यानंतर आईचा जीव कासावीस होतो. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या अश्याच एका आईच्या त्या कृतीमुळे लेकराचा जीव वाचला आहे. आजारी पडलेल्या मुलाला श्वास घ्यायला त्रास होता. डॉक्टरांनी फ्ल्यू झाल्याचे सांगितले. घाबरलेल्या या आईने मात्र धीर दाखवला आणि तिच्या मुलाला या गंभीर आजारातून बरे केले आहे.
अमेरिकेच्या लुब्बॉसमधील ही घटना आहे. एका सहा वर्षाच्या मुलाची तब्येत बिघडली. विटन डॅनियल असं या मुलाचे नाव आहे. एकेदिवशी विटनचे डोके दुखत होते. यानंतर चक्कर आली. चालणं, बोलणं,श्वास घ्यायला त्रास होत होता. मुलाची ही अवस्था पाहून आईही घाबरली तिने त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर विटनला फ्लू झाला असं सांगितलं.
मुलाची तब्येत बिघडली असल्यामुळे आई घाबरली, तिला चैन पडत नव्हते. यावेळी विटनच्या आईने केसी डॅनियलने गुगलवर सर्च केलं तर तिला अत्यंत धक्कादायक माहिती मिळाली. यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली.
माहितीनुसार, विटनची तब्येत बिघडल्याने त्याला रूग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी त्या फ्लू असल्याचं सांगितलं. पण पुढील २४ तासांत मुलाची प्रकृती आणखी खालावली हळहळू विटनला श्वास घ्यायला, चालायला आणि बोलण्याचा त्रास व्हायला लागला. एवढंच नाही तर विटन बेशुद्ध पडला. आईची काळजी वाढली. डॉक्टरांनी त्याची पूर्ण तपासणी केली. इंट्युबेट केलं ज्यामध्ये त्याला प्लूपेक्षाही गंभीर आजार असल्याचं सांगितलं. त्याला जी लक्षणं होती ती कॅव्हर्नस मालफॉर्मेशन किंवा कॅव्हर्नोमा या आजाराची होती.
हा एक दुर्मिळ आजार असून ५०० पैकी फक्त एकाच व्यक्तीला हा आजार होतो. रूग्णांना या आजाराची लक्षणे लवकर कळून येत नाही. असं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारामध्ये रक्तस्त्राव होणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि दृष्टी समस्या होतात. तर घरातील कोणत्या व्यक्तीला हा आजार असेल तर तो होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांनी विटनच्या आईला सांगितले की, या आजारांमध्ये विटन चालू शकणार नाही, व्हेंटिलेटर आणि फीडिंग ट्यूबवर त्याला राहावे लागणार आहे. हा आजार होण्यापूर्वी फक्त दोन आठवड्यांपूर्वी विटनला बेसबॉल संघातील सर्वोत्तम खेळाडून म्हणून सन्मानित केलं.
विटनच्या आईने आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. गुगलवर या आजाराबद्दल माहिती मिळवली. आजाराबद्दल माहिती शोधत असताना, तिला ह्यूस्टनमधील यूटी हेल्थ हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. जॅक मोरकोस यांचा एक लेख आढळला. डॉ. जॅक्स कॅव्हर्नोमाच्या उपचारात तज्ज्ञ आहेत. केसी यांनी डॉ. मोरकोस यांना ईमेल पाठवला आणि त्यांनी लगेचच त्याचं उत्तर दिलं आणि विटनला ह्यूस्टनला घेऊन या असं सांगण्यात आलं.
विटनला एअर अॅम्ब्युलन्सने ह्यूस्टनला घेऊन जाण्यात आलं. जिथे डॉ. मोरकोस आणि बालरोग न्यूरोसर्जन डॉ. मनीष शाह यांनी चार तासांची सर्जरी करुन त्याचे प्राण वाचवले. काही तासांतच, विटन शुद्धीवर आला आणि स्वतः बोलू आणि श्वास घ्यायला सुरुवात केली. सहा आठवड्यांच्या उपचारानंतर तो बरा झाला. विशेष म्हणजे त्याच्या सातव्या वाढदिवसापूर्वी घरी परतला असून आता तो आता शाळेत जातो आणि बेसबॉलही खेळतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.