Leopard Holi video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बिबट्यालाही नाही सोडलं...; बिबट्याला रंग लावतानाचा व्हिडीओ व्हायरल, युजर्स पडले संभ्रमात

Leopard Holi video: इंस्टाग्रामवर बिबट्यासोबत रंगपंचमी साजरी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. मात्र नंतर समोर आलं की हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर होळीच्या निमित्ताने एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये काही जण बिबट्यासोबत रंगपंचमी साजरी करताना दिसतात. यावेळी बिबट्याच्या तोंडावर गुलाल लावलेला आहे आणि आजूबाजूला लोक नाचत-गात होळी साजरी करताना दिसतायत.

पहिल्यांदा पाहिल्यानंतर हा व्हिडीओ अगदी खरा वाटतो. मात्र त्यानंत समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील ‘oye_sanki_1’ या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता. पोस्टसोबत प्रेक्षकांना प्रश्न विचारण्यात आला होता, 'हा व्हिडीओ खरा आहे का AI ची कमाल?' सुरुवातीला अनेकांनी हा प्रसंग खरा असल्याच्या कमेंट्स केल्या आहे. काहींनी गमतीने 'इथे काहीही शक्य आहे' अशा कमेंट्स केल्यात.

काय दिसतंय व्हायरल व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये हा बिबट्या शांत बसलेला दिसतोय. यावेळी त्याच्या कपाळावर गुलाल लावलेला असून आसपास लोक रंग उधळत नाचत आहेत. दृश्य इतकं खरं वाटतंय की, सामान्यांना खरंच बिबट्यासोबत रंगपंचमी खेळल्याचं वाटलंय.

नंतर अनेक युजर्सनी बारकाईने पाहिल्यानंतर हा व्हिडीओ AI च्या साहाय्याने तयार केल्याचं ओळखलं. काहींनी कमेंटमध्ये सांगितलं की, 'तंत्रज्ञान इतकं प्रगत झालंय की, खरं-खोटं ओळखणं अवघड झालं आहे.' तर काहींनी अशा व्हिडीओमुळे चुकीची माहिती पसरू शकते, अशी चिंता व्यक्त केली.

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

पुण्यात धक्कादायक प्रकार! गॅस सिलेंडरमधून निघालं 10 लिटर पाणी

SCROLL FOR NEXT