Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बस स्थानकात शालेय विद्यार्थ्यांच्या तुफान राडा, भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी एकमेंकाना तुडवले; VIDEO व्हायरल

Fighting Video: सोशल मीडियावर सध्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या घटनेत काही गटांमध्ये तूफान हाणामारी झालेली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nandurbar Video: नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा बस स्थानक परिसरात विद्यार्थ्यांचा तुफान राडा पाहायला मिळाला. शाळेत जाणारे विद्यार्थी हे बस स्थानकात किरकोळ वादातून आपसात भिडले. ८० ते ९० विद्यार्थी हे एकमेकांचा अंगावर धावून गेले. खेड्यातून येणारे विद्यार्थी हे मोठ्या संख्येने बस स्थानकात जमतात, या विद्यार्थ्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गँग तयार झाल्या असून त्यांच्यात नेहमी वाद होत असतात. त्या वादातूनच हा राडा झाल्याची माहिती असून यातील अनेक विद्यार्थी हे अमली पदार्थाचे सेवन करत असतात. त्यातूनच दररोज या भागात लहान मोठी भांडणे होत असल्याची माहिती आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा बस स्थानक परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटात किरकोळ वादातून वाढ झाली आहे. दररोजच्या वादाचे रूपांतर आज हाणामारीत(Fighting) झाले. विद्यार्थ्यांचे दोन गटात राडा झाला. उपस्थित ८० ते ९० एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली.

खेड्यावरून शिक्षणासाठी मिळणारे विद्यार्थी आहेत, तळोदा बस स्थानकात वाट बघत असतानाच राडा झाला. या हाणामारीतील अनेक विद्यार्थी हे आम्ही पदार्थाचे व्यसन करत असतात. इंडिया सोबतच या विद्यार्थ्यांमध्ये आलेख या निर्माण झाले आहे. आपल्या गँग वर्चस्व दाखवण्यासाठी हे विद्यार्थी मारहाण करत असल्याचं समोर आलेय. परिसरात दररोज अशा प्रकारचे लहान मोठे वाद होत असतात.

या विद्यार्थ्यांनी केलेल्या मारामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. पोलिसांनी अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई केल्याचं समजले नाही. मात्र परिसरात दररोज लहान मोठी भांडणे होत असतात, तरीदेखील पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी या भागात फिरकत नसल्याची स्थिती आहे..व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील''SaamtvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter List : 'प्रत्येक ठिकाणी 4 लाख बोगस मतदार'; व्होटचोरीचं लोण मुंबईपर्यंत, वाचा स्पेशल रिपोर्ट

Pothole Deaths : 'खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास वारसांना भरपाई'; मुंबई हायकोर्टाने काय निर्णय दिला? जाणून घ्या

Makyacha Chivda Recipe: दिवाळीसाठी कुरकुरीत खमंग मक्याचा चिवडा कसा बनवायचा?

Mumbai-Ahmedabad Highway: अवजड वाहनांच्या 15 किलोमीटरपर्यंत रांगा; चौथ्या दिवशीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

Dangers of eating quickly: घाईघाईत जेवणाची सवय तुम्हालाही आहे का? शरीरात सुरू होतो ‘हे’ धोकादायक बदल

SCROLL FOR NEXT