fact check saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

Crow Carrying Rs 500 Note Bundle Goes Viral: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो...आताा एक कावळा 500 रुपयांच्या नोटांचं बंडल आणत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...नोटांचं बंडल आणणारा कावळा अशा नावाने हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांनाच याची उत्सुकता आहे...खरंच हा कावळा नोटांची बंडलं आणतो का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

Sandeep Chavan

...या व्हिडिओत कावळा चोचीतून बंडल घेऊन येताना दिसतोय...आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...कावळ्याने चोचीत पकडून नोटांचं बंडल आणलं आणि खिडकीत ठेवलंय...यावेळी एक व्यक्ती ते बंडल घेतो...पण, खरंच या कावळ्याने कुणाकडून 500 रुपयांचं बंडल आणलंय का...? हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेक सवाल उपस्थित होतायत...

कावळा चोचीत 500 रुपयांच्या नोटांचे बंडल घेऊन येताना आणि खाली ठेवताना दिसतोय...हा अद्भूत नजारा पाहून अनेक जण थक्क झालेत...कावळ्याच्या चोचीत नोटांचे बंडल दिसते, तर पुढच्याच सेकंदाला चोच रिकामी होऊन अचानक माणसाचा हात दिसतो...पण, खरंच कावळ्याने एवढं नोटांचं वजन उचललं का...? एककावळ्याचे वजन अंदाजे 250 ग्रॅम असते, तर नोटांचे बंडल चोचीत धरून उडणे पक्ष्यासाठी तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का...? यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

कावळ्याचा व्हायरल व्हिडिओ पूर्णपणे बनावट

कावळ्याने 500च्या नोटांचं बंडल चोचीतून आणलं नाही

व्हिडिओ कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि VFX द्वारे बनवला

हा व्हिडिओ बनवण्यात आला असून, अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या आणि बनावट व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका...कारण, तुमची दिशाभूल करण्यासाठी असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...आणि असे व्हिडिओ पाहून काहीजण शेअर करतात...त्यामुळे आमच्या पडताळणीत कावळ्याने नोटांचं बंडल आणल्याचा दावा असत्य ठरला..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT