Air India Buisness Coach Viral Video News Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : एअर इंडियाच्या विमानात किळसवाणा प्रकार, प्रवाशाची सहकारी प्रवाशावर लघुशंका, VIDEO व्हायरल

Air India Buisness Coach Viral Video News : दिल्ली ते बँकॉक एअर इंडियाच्या बिझनेस क्लास केबिनमध्ये मद्यधुंद प्रवाशाने इतर प्रवाशांवर लघवी केल्याचा संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alisha Khedekar

  • दिल्ली–बँकॉक एअर इंडिया बिझनेस क्लासमध्ये मद्यधुंद प्रवाशाने इतर प्रवाशांवर लघवी केली

  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप

  • एअरलाइनच्या प्रोटोकॉलवर प्रश्न उपस्थित

विमानातून प्रवास करणं प्रत्येकाला आवडतं. त्यात बिजसनेस क्लास असेल तर अधिक उत्तम. ट्रेन सारखी गर्दी नाही, झटपट प्रवास, स्वच्छता, आणि आरामदायी प्रवास यामुळे विमान प्रवास हा अधिका अधिक पसंत केला जातो. मात्र याच विमान प्रवासातील एक संतापजनक व्हिडिओ समोर आला आहे. एक मद्यधुंद प्रवासी इतर प्रवाशांवर लघवी करू लागला असल्याचा गंभीर आरोप आहे. हा व्हिडिओ कंटेंट क्रिएटर शिवम राघव याने सोशल मीडियावर व्हिडिओ आणि सविस्तर वर्णन पोस्ट केले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडिओ हा नवी दिल्ली ते बँकॉकला जाणाऱ्या एअर इंडिया विमानामधील आहे. हा व्हिडिओ २३ वर्षीय कंटेंट क्रिएटर शिवम राघव याने चित्रित केला असून त्याच्याच सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल करण्यात आला आहे. शिवम हा एकटाच प्रवास करत होता. तो दिल्ली ते बँकॉक मार्गावर वारंवार प्रवास करतो आणि यावेळी थाई एअरवेजच्या तुलनेत एअर इंडियाच्या बिझनेस क्लासची सेवा अनुभवण्यासाठी त्याने हा पर्याय निवडला. मात्र विमानातील सेवा चांगली असली प्रवासादरम्यान घडलेली ही घटना त्याच्यासाठी आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव ठरली. बिझनेस क्लासमध्ये फक्त आठ सीट्स होत्या, २-२ रांगेत व्यवस्था होती. सुदैवाने त्या केबिनमध्ये कोणतीही महिला प्रवाशी नव्हती अन्यथा परिस्थिती आणखी भयानक झाली असती, असे शिवमने म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये चित्रित झाल्याप्रमाणे वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर त्या प्रवाशाने थेट केबिनमध्ये उभे राहून लघवी सुरू केली. एका प्रवाशाच्या अंगावर आणि पँटवर पडल्याने त्याला कपडे बदलावे लागले. संपूर्ण फ्लोअर ओले झाले होते. क्रू मेंबर्सना विचारणा करणारे आवाज ऐकू येतात, "तुम्ही काय बोलता आहात? मी असे काही केले नाही" शिवम स्वतः म्हणतो, "भाई, मी इथे बसलोय, तो वॉशरूममधून आला आणि तिथेच लघवी करू लागला. हे बिझनेस क्लास आहे की काय आहे भाई!"

धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या गोंधळानंतर विमानाचं लँडिंग झालं मात्र त्या आरोपी प्रवाशावर कोणतीही कारवाई न करता सहज बाहेर जाऊ दिले गेले. यामुळे शिवमने प्रश्न उपस्थित केले की विमानात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कायदे किंवा प्रोटोकॉल नाहीत का? बिझनेस क्लासचे महागडे तिकीट (सुमारे ८० हजार रुपये) काढले तरी अशा घटनांवर नियंत्रण का नाही? एकटी महिला प्रवासी असती तर तिची सुरक्षितता कशी जपू शकली असती?

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकऱ्यांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर टीका केली. लोकांनी लिहिले, "बक्कळ पैसे असले तरी संस्कार विकत घेता येऊ शकत नाहीत. अशा गुंड प्रवाशांना उड्डाणावर बंदी घालावी." तर दुसऱ्याने म्हटले आहे की, "विमानात दारू पिऊन येणे बंद करा, विशेषतः भारतीय प्रवाशांसाठी फ्री दारू मिळते म्हणून काही लोक जास्त पितात." काहींनी मागील अशा घटनांचा उल्लेख करत एअरलाइनला जबाबदार धरले, तर काहींनी प्रवाशांच्या वागणुकीला दोष दिला. एअर इंडियाने अद्याप या घटनेबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटना सामान्य होऊ नयेत यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बारा पोलिसांवर कारवाईची टांगती तलवार

Pune Corporation Election: पुण्यातील भाजप शिवसेना युतीची "इनसाईड स्टोरी''; भाजपला प्रस्तावात दिलेल्या जागांची यादी "साम" वर

New Year 2026 Wishes Marathi : नववर्षाच्या शुभेच्छांनी आणखी गोड होईल तुमचा दिवस! Status, Story साठी खास मेसेज

१० वर्षांपूर्वी फार्म हाऊसवर कसे पकडले गेले? तिकीट कापल्यानंतर इच्छुक उमेदवाराचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT