Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: ट्रेनमध्ये दिसला माय-लेकींचा रूद्र अवतार, क्षुल्लक कारणांवरुन धरली प्रवाशाची कॉलर;पहा VIDEO

Train Viral Video:पुन्हा एकदा ट्रेनच्या सीटवरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आलाय जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Train Fighting Viral Video

आपल्यापैंकी प्रत्येकजण दररोज ट्रेन, (Train)बस तसेच अन्य वाहनांतून प्रवास करत असतो.या धापवळीच्या युगात प्रत्येकजण कामासाठी बाहेर पडत असल्याने सर्व प्रवासी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. अनेकवेळा या प्रवासात प्रवाशांमध्ये शुल्लक गोष्टींवरुन तर कधी सीटवरुन वादविवाद होत असतात..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मात्र शुल्लक गोष्टीवरुन झालेल्या वादाचे रुपांतर कधी कधी जोरदार हाणामारीमध्ये झाल्याचे आपण पाहिले असेल. बहुतेक वेळा प्रवासादरम्यान सीटवरुन प्रवाशांमध्ये वाद झालेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसतात. अशातच पुन्हा एकदा ट्रेनच्या सीटवरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आलाय जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ डेहराडून ते गोरखपूर ट्रेनमधील आहे,ज्यामध्ये दोन महिला आणि एका प्रवाशांमध्ये ट्रेनच्या सीटवरून भांडण (Fight)सुरु आहे. भांडण सुरु असताना ट्रेनमधील इतर प्रवासी त्यांचे भांडण शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत,मात्र महिला कोणाचं ऐकताना दिसत नाही.हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

व्हिडिओमध्ये एक पुरुष ट्रेनमधील अप्पर सीटवर बसलेला आहे. तिथे असलेली महिला त्या पुरुषाची शर्ट पकडून त्याला खाली उतरण्यास सांगत असल्याचे दिसते. महिलेस तिची मुलगी त्या व्यक्तीशी वाद घालताना दिसत आहे. यात महिलेची मुलगी ही त्याला सीटवरुन खाली उतरण्यास सांगत आहे.या दोघींना व्यक्ती प्रतिउत्तर करण्याचा प्रयत्न करत असतो. ट्रेनमधील इतर प्रवाशी यांचे वाद पाहत आहेत.

@gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत असलेल्या पहायला मिळत आहे. यापूर्वीही ट्रेन प्रवासादरम्यान भांडण करतानाचे अनेक व्हिडीओ पहायला मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना दिलासा, वीज दरात सवलत, फडणवीस सरकारचे ४ मोठे निर्णय

Maharashtra Live News Update: जरांगेंनी सरकारला इशारा दिला, त्यावर भुजबळ काय म्हणाले?

Sakhi Gokhale: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लेकीने परदेशात घेतलंय शिक्षण; आज गाजवतेय इंडस्ट्री

Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

'अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं, मोदींकडून पाठिंबा' विजय पांढरेंचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT