उल्हासनगर येथील हिराघाट परिसरात महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरली आहे. या जत्रेमध्ये काल एक मोठी दुर्घटना घडली. फिरत्या आकाश पाळण्यातून एक लहान मुलगी खाली पडली. मुलगी पाळण्यामध्येच अडकून पडली होती. तिला वाचवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आकाशाला भेट देतोय असं भासवणाऱ्या या आकाश पाळण्यातून मुलगी खाली पडली तेव्हा जत्रेत एकच गोंधळ निर्माण झाला. यावेळी पाळणा चालकाचे पटकन लक्ष गेले आणि त्याने लागलीच पाळणा थांबवला. सुदैवाने मुलगी या पाळण्यातच अडकून पडली होती.
पाळण्यातून मुलगी खाली पडली अशी महिती मिळताच जत्रेमध्ये आलेल्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. तिला वाचवण्यासाठी पाळणा चालक आणि स्थानिक नागरिक पुढे धावून आले. पाळणा चालक अन्य नागरिकांच्या मदतीने उंच पाळण्यावर चढला. तसेच मुलीला पाळण्यातून खाली उतरवले.
सुदैवाने या मुलीचा जीव बचावला आहे. तिला पाळण्यातून खाली उतरवताच मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले असून घरी सोडण्यात आले आहे. या मुलीचा बचाव करतानाचा व्हिडिओ तेथील काही नागरिकांनी आपल्या फोनमध्ये कैद केलाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
जत्रेमध्ये फिरालया गेल्यावर येथील सर्वांना उंच आकाशपाळण्याचं आकर्षण असतं. मात्र आकाश पाळण्यात बसल्यावर अनेकांच्या पोटात गोळा येतो. त्यामुळे स्वत:ची काळजी घेत हौस आणि मौज मजा करावी. लहान मुलांना जत्रेमध्ये नेल्यावर आकाश पाळण्यात बसल्यावर त्यांच्याबरोबर रहावे. त्यांना एकटे सोडूनये.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.