शाळेच्या वर्गात शकीराच्या 'Waka Waka' गाण्यावर विद्यार्थिनींसोबत थिरकणारी शिक्षिका – व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस Saam Tv
व्हायरल न्यूज

भरवर्गात शिक्षिकेने लावला ठेका; लहानग्या विद्यार्थिनींसह 'वाका वाका' वर केला धमाकेदार डान्स; VIDEO

Teacher Dances With Students: शाळेच्या वर्गात शिक्षिकेने विद्यार्थिनींसोबत एका गाण्यावर केला जबरदस्त डान्स. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, नेटकरी म्हणाले, "आमच्या वेळी अशी शिक्षिका असती तर..!

Tanvi Pol

Dance Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे, ज्या व्हिडिओमध्ये एका शाळेच्या शिक्षिकेला तिच्या विद्यार्थिनींसह वर्गात थिरकताना पाहायला मिळतं. हे गाणं काही वेगळं नाही, तर जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेलं शकीराचं वाका वाका(This Time for Africa) या गाण्याच्या ठेक्यावर वर्गातला संपूर्ण माहोलच उत्साही झाल्याचं व्हिडीओत दिसतं. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून कौतुकाचं पाऊस पाडलं आहे, तर काहींनी ‘आमच्या वेळी अशी शिक्षक असती तर?’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

या व्हायरल(Viral) व्हिडीओमध्ये एक शिक्षिका वर्गात उभी असून तिच्यासमोर विद्यार्थिनी उभ्या आहेत. वाका वाका गाणं सुरू होताच शिक्षिका आणि विद्यार्थिनी एकाच ठेक्यावर नाचायला लागतात. दोघींच्या चेहऱ्यावर हास्य आणि उत्साह स्पष्ट जाणवत आहे. एकंदरित वातावरण खूपच सकारात्मक आणि आनंददायी वाटतं. शाळेत शिक्षणाबरोबर आनंदाने वेळ घालवण्याचाही किती चांगला अनुभव असतो, हे या व्हिडीओतून दिसून येतं.

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनींसह शकीराच्या ‘वाका वाका’ गाण्यावर डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आमच्या वेळी अशा शिक्षिका…’

गेल्या काही वर्षांपासून शिक्षणपद्धतीत मोठे बदल होत आहेत. पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांच्या सहभागावर आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला जातोय. नृत्य, गाणी, खेळ, आणि इतर सर्जनशील पद्धतींनी शिकवणं विद्यार्थ्यांना आकर्षित करतं, तसंच शिकवलेलं दीर्घकाळ लक्षात राहतं. या व्हिडीओतील शिक्षिका याच बदलाचं उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि टीमवर्क यांचा समावेश करत शिकवण्याचं नवं स्वरूप सादर केलं आहे

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर पोस्ट होताच काही तासांतच हजारो व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर्स मिळाले. अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलं की,''आमच्या शाळेत अशी शिक्षिका असती तर शाळा सुट्टीच वाटली नसती. ''हेच आहेत खरे शिक्षक, शिक्षणासोबत आनंददायी वातावरण निर्माण करणारे'',''वर्ग म्हणजे फक्त धडे नाही, हे असं शिक्षण कायम लक्षात राहतं'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi High Court : लिव्ह-इन पार्टनर्सना पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश

Afternoon Sleeping Time: दुपारी कधीपण झोपू नका, 'ही' आहे योग्य वेळ

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा मुंबईसाठी मास्टर प्लान! पायाभूत सुविधांचे नवे युग अन् मायानगरीचा महाकायापालट

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT