Abharnath Viral Video: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरातील रहिवासी इमारतीत रात्री मोठी खळबळ उडाली, जेव्हा एका फ्लॅटमध्ये भलामोठ्या साप आढळला. नेहमीप्रमाणे घरातील सदस्य कामात व्यस्त होती दरम्यान एका सदस्याला त्यांच्या सोफ्याच्या बाजूला काही हालचाल जाणवली. सुरुवातीला उंदीर किंवा सरडा असावा असा अंदाज त्यांनी व्यक्त केला, पण जेव्हा त्यांनी नीट पाहिलं, तेव्हा समोर भलामोठा साप दिसला. क्षणभर घरातील सगळ्यांचे धाबे दणाणले.
हा साप(Snake) इतका मोठा होता की पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे आले. जवळपास ६ ते ७ फूट लांब वळवळणारा साप सोफ्याच्या बाजूला दडलेला होता. घरातील महिलांनी आणि लहान मुलांनी घाबरून गोंधळ घातला. तत्काळ त्या कुटुंबाने सोसायटीचे सुरक्षा रक्षक आणि व्यवस्थापन मंडळाला माहिती दिली. काही मिनिटांतच संपूर्ण इमारतीत ही बातमी पसरली आणि इतर रहिवासी देखील घाबरून गेले.
सर्पमित्रांनी तब्बल २०-२५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर सापाला हळूहळू पकडलं. त्यांनी विशेष साप पकडण्याचं काठी आणि प्लास्टिक कंटेनर वापरून काळजीपूर्वक त्याला सोफ्याच्या जवळून बाहेर काढलं. त्यानंतर सापाला एका सुरक्षित जंगल परिसरात नेऊन सोडलं.
अंबरनाथमधील हा प्रकार सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरलेला असून त्याचा व्हिडिओ(Video) देखील इन्स्टाग्राम jansanwadnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. घटना पाहिल्यानंतर अनेक नागरिकांनी विविध प्रतिक्रिया देखील दिलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''राहुदे घरात धामण आहे ती विषारी नाय'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''त्याचं जंगल तोडून इमारती बांधणार तर ते तरी बिचारे कुठे जाणार घरातच येणार ना'' अशा असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.