Dunk Woman On Road Saam Tv
व्हायरल न्यूज

Dunk Woman On Road: तरुणीचा रस्त्यावर तमाशा; मध्यधुंद अवस्थेत वाहतुकच रोखली; व्हिडिओ व्हायरल

uttarakhand viral Video: उत्तराखंडमधील एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीचा भररस्त्यात राडा पाहण्यासाठी मिळत आहे. पुढे काय घडते ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील तरुणांनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र याचबरोबर काही तरुण चुकीच्या मार्गाला लागल्याचंही चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियावर अशा अनेक घटना वारंवार समोर येतात, ज्या पाहून सामान्य नागरिक अचंबित होतो शिवाय काळजीतही पडतो.

सोशल मीडियावर सध्या या संबंधित एका तरुणीचा(Girls) व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. जिथे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणीने धिंगाना घातलेला आहे. तरुणींच्या अशा वागणुकीमुळे भररस्त्यात गर्दीच्या वेळेला भलीमोठी ट्रॉफिंक जाम झालेली आहे. तरुणींला काहींनी रस्त्यावरुन उठवण्याचा प्रयत्न करतात.

मात्र तरुणी जिद्दीला पेटून ती भररस्त्यात तशीच बसून राहते. काही वेळाने एक तरुण येतो आणि तिला रस्त्याच्या मधून उठवतो. तरुणीच्या अशा वागण्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सर्व प्रकार त्या परिसरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केला असून सोशल मीडियावरही अपलोड केला. पाहता पाहता हा व्हिडिओ काही तासांतच देशभरात पसरला.

ही घटना उत्तराखंडमधील देहरादून येथील रायपूर ऑर्डिनन्स फॅक्टरी परिसरातील आहे. हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम, एक्स(ट्वीटर), फेसबूक अशा विविध माध्यमांवर पाहता येत आहे आणि त्यावर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका यूजरने म्हटले,''खुप वाईट आहे'' तर ''तरुणाईला काय झाले आहे'' असे दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे.

टीप: हा तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT