UP Viral Video News: Saamtv
व्हायरल न्यूज

UP Viral Video: हृदयद्रावक! 'बाबा मुलांची काळजी घ्या..' आधी व्हिडिओ बनवला अन् तरुणाने नदीत उडी मारली; VIDEO व्हायरल

UP Viral Video News: यूपीच्या (Uttar Pradesh) अनुपशहर भागात राहणाऱ्या तरुणाने आपल्या वडिलांना उद्देशून व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर नदीत उडी मरुन आत्महत्या केली.

Gangappa Pujari

Viral Video News:

देशभरात आत्महत्यांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय ठरत आहे. छोट्या छोट्या अपयशाने, नैराश्याने लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आत्महत्येच्या काही घटना भयंकर अन् मन सुन्न करणाऱ्या असतात. उत्तरप्रदेशमधून अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशमध्ये एका तरुणाने व्हिडिओ बनवून आत्महत्या केली. हा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

काय आहे प्रकरण?

यूपीच्या (Uttar Pradesh) अनुपशहर भागात राहणाऱ्या तरुणाने आपल्या वडिलांना उद्देशून व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर नदीत उडी मरुन आत्महत्या केली. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलीस आणि कुटुंबिय त्याचा शोध घेत आहेत.

व्हिडिओमध्ये काय म्हणाला तरुण?

बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या, मी अनुपशहरच्या गंगेत उडी मारत ​​आहे, असा हा तरुण या व्हिडिओमध्ये म्हणत आहे. ज्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याचे नाव रिंकू असून तो गाव बरौलीचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा व्हिडिओ तरुणाने त्याच्या कुटुंबीयांना पाठवला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांशी संपर्क साधला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, पोलिसांनी स्टीमर आणि डायव्हर्सच्या मदतीने अनुपशहरमधील गंगा पुलाच्या दोन्ही काठावर शोध सुरू केला. मात्र, दिवसभराच्या शोधमोहिमेनंतरही या तरुणाचा काहीही पत्ता लागला नाही. या घटनेने तरुणाच्या कुटुंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे आश्वासन पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT