Rikckshaw Driver Crashed Man Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: पहाट जीवघेणी ठरली! मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला रिक्षाने चिरडले; थरकाप उडवणारा VIDEO

Rikckshaw Driver Crashed Man Viral Video: मॉर्निंग वॉकला गेलेल्या चिमुकल्याला रिक्षाने चिरडले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

Gangappa Pujari

Viral Accident Video:

सोशल मीडियावर भीषण अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी वाहकाच्या बेदरकारपणामुळे तर कधी पादचाऱ्याच्या चुकीमुळे क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं. उत्तप्रदेशमधून असाच एक काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या चिमुकल्याला रिक्षाने चिरडले, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे उत्तरप्रदेशच्या जालौनमध्ये भरधाव ऑटोने एका तरुणाला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर रिक्षाने चिमुकल्या मुलाला ५० मीटर फरफटत नेले. या दुर्दैवी घटनेत तरुणाला आपला जीव गमवावा लागला.

अपघाताचा (Accident Video) हा थरकाप उडवणारा क्षण सीसीटिव्ही कॅमेऱ्यात (CCTV Footage) कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून संबंधित रिक्षा चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, तरुण आपल्या मित्रासोबत मॉर्निंग वॉक करताना दिसत आहे. दोघेही रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव रिक्षा येत असल्याचे त्यांना दिसले. काही समजायच्या आतचं रिक्षाचालकाने मुलाला जोराची धडक दिली. इतकेच नव्हेतर धडक दिल्यानंतर मुलाला ५० मीटरपर्यंत फरफटत नेले.

अपघातानंतर हा रिक्षाचालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच काही जणांनी मुले चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करत होती, त्यामुळे हा अपघात झाल्याचे म्हणले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्या दिवशीच शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक; तोडफोडही केली, भाजपवर आरोप

Viral Video: चालत्या बाईकवर मारहाण! पत्नीने 27 सेकंदात पतीला १४ वेळा लगावल्या कानाखाली

Municipal Election : मतदानाआधी जिथं-तिथं पैशांचा पाऊस, VIDEO

Maharashtra Live News Update: मकर संक्रांति निमित्त औंढा नागनाथ मंदिरात महिलांनी वान दिले

महापालिका मतदानापूर्वीच खळबळ; शेकडो मतदान कार्डांचा ढीग आढळला, निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT