Lalit Patil
Lalit Patil Saam tv

Lalit Patil Case : ललित पाटीलच्या त्या मैत्रिणीबाबत मोठा खुलासा, पोलीस तपासाला वेगळी दिशा मिळणार?

Lalit Patil Case Update News : सध्या प्रज्ञा पोलीस कोठडीत आहे. प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
Published on

Pune Crime News :

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये ललित पाटीलला मदत करणाऱ्या दोन मैत्रिणींचाही समावेश आहे. ललित पाटीलची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याची माहिती तिच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.

प्रज्ञा कांबळेवर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती तिच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार देखील सुरू आहेत, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर केले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lalit Patil
Pune Breaking News : पुण्यावरचा मोठा धोका टळला; पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड

सध्या प्रज्ञा पोलीस कोठडीत आहे. प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. प्रज्ञा हिच्यावर २०१९ पासून उपचार सुरू असल्याचे त्यात नमूद केले आहे. अर्जाची पुष्टी करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात आले आहेत. (Pune News)

Lalit Patil
Parbhani Crime News: महिलेचे हातपाय बांधून चोरीचा प्रयत्न; मानवत शहरातील घटना

ससून रुग्णालयातून पळून जाण्यापूर्वी ललित त्याच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम आणि ॲड. प्रज्ञा अरुण कांबळे यांना भेटला होता. दोन दिवसांच्या भेटीदरम्यान मैत्रिणीने त्याला २५ लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रज्ञा कांबळेच्या वकिलांच्या दाव्यामुळे या प्रकरणाच्या तपालासा वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण काय आहे?

2020 मध्ये अंमली पदार्थ विक्री प्रकरणात, ललित पाटील याला अटक करण्यात आली होती. ललित पाटीलकडून 16 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. पाटील स्वत: अंमली पदार्थ तयार करत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

'ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्याचा साथीदाराला देखील अटक केली. त्याच्याकडून दोन कोटी 14 लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी ललित रुग्णालयातून फरार झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com