Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नादच खुळा! 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' गाण्यावर आजींचा जबरदस्त डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Grandma Viral Dance: सोशल मीडियावर सध्या एका गावातील व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने कौतुक होत आहे.नक्की काय आहे व्हिडिओत ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Aji Dance Video:  व्यक्तीचे वय लहान असो किंवा मोठे, प्रत्येकाच्या आनंदाचा खजिना छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो.सध्याच्या तरुण पिढीला जीवनातील दु:ख बाजूला सारुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य ठेवणं खूप कठीण जाते.मात्र जुनी पिढी या गोष्टी करणं येयच.सोशल मीडियावर वारंवार प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यातच सध्या एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे.ज्यात एक आजी सर्व विसरुन आनंदाने डान्स करताना दिसतेय.व्हिडिओतील आजींचा उत्साह पाहिल्यानंतर नेटकरीही त्यांचे कौतुक करत आहेत.

आजींची एनर्जी पाहून नेटकरी झाले फिदा

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओतील परिसर गावाकडील आहे.जिथे असलेल्या एका मंडळातर्फे गावातील महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केलेला आहे.दरम्यान त्या कार्यक्रमातील अ‍ँकर आहे ते दोन आजींसोबत 'गंगू तारुण्य तुझं बेफाम' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.आजींच्या डान्सचा उत्साह पाहून गावातील अन्य लोक टाळ्या वाजून त्यांचा उत्साह वाढवत आहेत.

आजींचा डान्स व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील b_vishal_78 या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी हजारोंच्या संख्येने लाईक्स केलेले आहेत आणि लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूजही मिळत आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच पंसतीस आलेला आहे.

नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव!

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''शेवटची ही पिढी आहे जी डोक्यावरचा पदर पडू देत नाही'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''सलाम ह्या माउलीला'' तर तिसऱ्या यूजरने लिहिले आहे,''आताच्या पिढ्यांना हे जमणार पण नाही'' तर अन्य यूजर्संनी हृार्ट इमोजी लिहिले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT