A woman seen performing an unusual dance inside a crowded metro train, as stunned commuters look on.  
व्हायरल न्यूज

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Dance Viral Video: भरगच्च मेट्रोत महिलेने अचानक डान्स करण्यास सुरुवात केली आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. काहींनी तिच्या वागण्यावर टीका केली, तर काहींनी हे मुक्तपणे जगणं म्हटलं आहे.

Tanvi Pol

Viral News: सध्या सोशल मीडियावर एक विचित्र व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे एका महिलेचा जी भरगच्च प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रो ट्रेनमध्ये डान्स करताना दिसतेय. तिचा हा अनोखा आणि अनपेक्षित डान्स पाहून नेटकऱ्यांचंही डोकं फिरलं आहे. अनेकांनी तिच्या वागण्यावर टीका केलीय, तर काहींनी अशा वागणुकीचं समर्थन केलं आहे. मात्र एक गोष्ट निश्चित हा व्हिडिओ नेटवर सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

हा व्हायरल व्हिडिओ दिल्ली मेट्रोसारख्या गजबजलेल्या मेट्रोच्या डब्यात शूट करण्यात आला असल्याते दिसत आहे,मात्र याची खात्री होऊ शकली नाही. व्हिडिओच्या सुरुवातीला एक महिला मेट्रोच्या बरोबर मध्ये उभी असल्याचं दिसतं. काही क्षणांतच ती मोबाईलवर गाणं लावते आणि अचानक डान्स करायला लागते. इतर प्रवासी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. काही जण मोबाईल काढून तिचा व्हिडिओ शूट करताना दिसतात. ही महिला कोणत्याही प्रकारचा संकोच न करता, अगदी आत्मविश्वासाने नाचत असते.

लोकांचं लक्ष वेधून घेणं की अटेंशन सीकिंग?

महिलेचा हा प्रकार पाहून नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की, ''पब्लिक प्लेसमध्ये अशा प्रकारे वागणं योग्य नाही'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,'' ही जागा डान्ससाठी नव्हे, तर प्रवासासाठी असते'' काहींनी तर म्हटलं की, ''हे तर अटेंशन घेण्याचा प्रयत्न आहे'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

महिलेचा हा डान्स व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्रास, फेसबूक आणि ट्वीटर(एक्स) अशा प्रसिद्ध माध्यमांवर व्हायरल होत असून rareindianclips या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ नेमका कधीचा आहे ते नेमके समजले नाही,मात्र आतापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळालेले आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT