Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नांदेडचा बाहुबली..पाठीवर घेतली १२० किलोची मगर; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या नांदेडमधील हैराणजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यात पडले आहे.नक्की काय घडले ते एकदा पाहाच.

Tanvi Pol

Strong Man Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहण्यासाठी मिळेल सांगता येत नाही.कधी व्हिडिओ तरुणांच्या स्टंटबाजीचे असतात तर कधी मुंबई लोकलमधील महिलांच्या हाणामारीचे असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ यापेक्षा पूर्ण वेगळा आहे,ज्यात एका तरुणाने त्याच्या पाठीवर महाकाय मगर उचलली आहे.सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत (Video)तुम्ही पाहू शकता,एका व्यक्तीच्या पाठीवर तुम्हाला एक मगर दिसत आहे.अर्थात त्या व्यक्तीने ती मगर त्याच्या पाठीवर उचली आहे.जर मगरीचा आकार पाहिला तर अतिशय महाकाय आणि विशाल अशी मगर आहे.व्हिडिओमध्ये जर पाहिले तर तब्बल १२० किलो वजनाची ही मगर आहे आणि ती नांदेडमधील एका शेतात आढळून आली आहे.

मगरीचा सर्व व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून इन्स्टाग्रामच्या saamtvnews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''120 KG ची जिवंत मगर घेतली खांद्यावर''असे लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओला काही तासांतच असंख्य लाईक्स तर मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

ऐवढेच नाही तर व्हिडिओ अन्य सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेला आहे.मात्र सध्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''याना हिरो म्हणतात'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''अरे भावा मगर आहे ती.. गव्हाची गोण नाय''तर तिसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''फेक आहे हे'',अशा प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT