Boys Scary Stunt Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Viral Video: एवढी मस्ती कशासाठी? धावत्या ट्रेनला लटकत तरुणांचा जीवघेणा स्टंट; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO

Boys Scary Stunt Viral Video: व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Gangappa Pujari

Viral Video News:

सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. जगभरात घडणाऱ्या अनेक घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचतात. अनेकदा सोशल मीडियावर अशाही काही घटना समोर येतात, जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी संतापही होतो. सध्या काही काही तरुणांच्या प्रतापाने सर्वांचे लक्ष वेधले असून व्हायरल व्हिडिओवर नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत येण्यासाठी सध्याची तरुणाई कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी बाईकवर स्टंटबाजी करत तर कधी रस्त्यावर डान्स करत हे तरुण चर्चेत येत असतात. मात्र अनेकदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये काही मुले धावत्या ट्रेनला लटकून स्टंट करताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन सुटल्यानंतर हे तरुण त्याला लटकून खाली पाय टाकून घसरत घसरत जात असल्याचे दिसत आहे. आपल्या एका चुकीमुळे जीवही जावू शकतो, याचेही भान या मुलांना नाही. हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील (Mumbai Local) असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धावत जाऊन वेगात जाणारी ट्रेन पकडतो. दुसरा तरुण ट्रेनच्या दरवाजाला लटकतो. दोन्ही तरुण हाताने दरवाचा पकडतात आणि पाय फलाटावर सोडतात यावेळी त्यांचे पाय ट्रेनबरोबर फरपटत जातात.

मुलांचे हे कृत्य स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका नेटकऱ्याने अशा मुर्खांना पोलिसांनी फटकावले पाहिजे, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT