Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तरुणांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल 'लावणीसम्राट', मरिन ड्राईव्हवरील VIDEO व्हायरल

Viral News : दोन तरुणांचा लावणीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dancer Viral Video :

मुंबईचा 'क्विन नेकलेस' अर्थात मरिन ड्राईव्ह पाहायला देशभरातून रोज हजारो लोक येत असतात. मरिन ड्राईव्हचे अनेक फोटो, व्हिडीओ तुम्ही आजवर सोशल मीडियावर पाहिले असतील. मरिन ड्राईन येथे पर्यटकांसोबत अनेक इन्फ्लुएन्सर, काँन्टेन्ट क्रिएटर आपले व्हिडीओ शूट करण्यासाठी येत असतात. असाचा एक मरिन ड्राईव्ह येथील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन तरुणांचा लावणीचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

लावणी डान्स चाहत्यांची संख्या मोठी आहे. अनेक नृत्यांगणा किंवा कलाकारांना एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कार्यक्रमात लावणीवर ठेका धरताना तुम्ही पाहिलं असेल. परंतु आता चक्क दोन तरुणांनी मरीन ड्राईव्हवर भर गर्दीत लावणीवर ठेका धरला आहे. लावणी करणाऱ्या या दोन तरुणांच्या डान्स मु्व्ह देखील एकदम परफेक्ट आहेत.

इन्स्टाग्रामवर rajdancer2021 या यूजरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओत दोन तरुण 'मला पिरतीच्या झुल्यात झुलवा' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. एखाद्या उत्तम डान्सरसारखे हे दोघे डान्स करत आहे. एखाद्या मुलीलाही करता येणार नाही असा डान्स या दोघांनी सादर केला.

इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'मुलींना पण नाही जमणार अशी लावणी करता तुम्ही खूप छान...नाद कलेचा' अशी कमेंट एका युजरने केली आहे.

राज हा सोशल मीडियावर नेहमी आपले डान्स, लावणीचे व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या या व्हिडीओला नेटकरी पसंती देताना दिसत आहे. राज याचा स्वतः चा डान्स क्लासदेखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

Skin Care : चेहऱ्यावर ब्लीच करण्याआधी 'या' पाच महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या

Rohit Sharma: रोहित भाऊ, वडापाव खाणार का? चाहत्याच्या प्रश्नावर हिटमॅनने दिलं त्याच्या स्टाईलमध्ये उत्तर, Video व्हायरल

Amla Benefits: वजन कमी होते, केस गळणे कमी होते...; रोज सकाळी एक आवळा खल्ल्याने होतात हे आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT