भारतीय लोक जेव्हा घर किंवा गाडी घेत असतात तेव्हा त्याची पूजा करत असतात. घरात नवीन कार घेतली तरी आपण त्याची पूजा करत असतो. याच परंपरेला फॉलो करत भारतातील दक्षिण कोरियाच्या दुतावासानं एका नव्या कारची पूजा केलीय. पूजा करत असल्याचा व्हिडिओ कोरियन दूतावासाद्वारे एक्स (आधीचे ट्विटर ) वर शेअर केलाय. दक्षिण कोरियाच्या दुतावासाने राजदूत चांग -जे-बोक यांच्यासाठी अधिकृत वाहन दिले गेले आहे. ही कार चांगली राहावी तसेच काही वाईट होऊन नये, यासाठी कारची हिंदू पद्धतीने पूजाविधी करण्यात आली. (Latest Viral News)
दूतावासाने एक्सवर पोस्ट करताना लिहिली की, " राजदूताचे अधिकृत वाहन म्हणून मिळाल्याने आम्हाला आनंद झालाय. शुभेच्छांसाठी आम्ही पूजा केली. आमच्या दूतावासाच्या नवीन प्रवासात कारचा सामावेश झालाय!" दरम्यान कारची पूजा ही हिंदू धर्माप्रमाणे करण्यात आल्यानं अनेक नेटकरी दक्षिण कोरियाच्या दुतावासाचं कौतुक करत आहेत. दुतावासाकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक पुजारी पूजा करताना आणि राजदूताच्या मनगटावर पवित्र धागा बांधताना दिसत आहे.
या पोस्टला सोशल मीडियावर खूप व्ह्यूज मिळालेत. अनेक वापरकर्त्यांनी कोरियन आणि भारतीय संस्कृतींच्या मिश्रणाची प्रशंसा केलीय. आलोक रंजन सिंग या वापरकर्त्याने सांगितले की, आमची संस्कृती आमची शान आहे. दुसरा एका नेट युझरनं कौतुक करताना म्हटलं की, हे खरंच कौतुकास्पद आहे. राजदूत आपल्या देशातील कार वापरणार आहेत. हा एक सकारात्मक संदेश आहे. तर एकजण म्हणाला की, हे इतर दुसऱ्या संस्कृतीविषयी आदर दाखवत आहे.
शुभेच्छा. दरम्यान काही दिवसांपूर्वी RRRचित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्यावर चांग जे-बोक यांनी डान्स केला होता. त्याचा व्हिडिओ भारतातील कोरियन दूतावासाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.