Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: दबक्या पावलांनी आला अन् हल्ला केला, लाडंग्याने आधी पायाचा लचका तोडला मग...

Cctv Footage: सोशल मीडियावर अनेकदा भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असतात. सध्या परत एकदा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहे. पाहा तरी नक्की काय घडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या अनेक महिन्यापासून भटक्या प्राण्याचे हल्ले व्यक्तीवर होत आहेत. या हल्ल्यात लहान मुलांपासून ते अनेकांना स्वता:चा जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्व धक्कादायक प्रसंगाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे, जिथे भर दिवसा दोन व्यक्तींवर एका लांडग्याने हल्ला केला आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचे समजते. सोशल मीडियावर आधी अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहेत. ज्यात भररस्त्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यांवर हल्ला होत असत तर कधी भटक्या वळूंचा रस्त्यावरील नागरिकांवर हल्ला, असे अनेक खरारक सीसीटीव्ही फुटेज (Cctv Footage)व्हायरल झालेले आहेत. मात्र पहिला असा सीसीटीव्ही असेल ज्यात दोन व्यक्तींवर लांडग्यांनी हल्ला केलेला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की, दोन व्यक्ती आहेत, जे रस्त्याच्या एका कडेला बसलेले आहेत. मात्र दोघही बसलेले असताना तिथे अचानक एक लाडंगा येतो आणि दोघावर हल्ला चढवतो. दोघही तिथून उठण्याचा प्रयत्न करतात मात्र एक लाडंगा पहिल्या व्यक्तीवर हल्ला करतो त्यानंतर दुसऱ्याही व्यक्तीवर हल्ला (Attack) करताना दिसत आहे. मात्र लाडंगा दुसऱ्या व्यक्तीच्या हातावर चावा घेतो त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या हाताने लाडंग्याला जोरात फेकून देतो. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ एका दिवसापूर्वी पोस्ट करण्यात आलेला असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले असून अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट्स बॉक्समध्ये लिहिले आहे की,'खूप थरारक आहे'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''दररोज अशा काहीशा घटना पाहायला मिळत आहेत''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT