Leopard Attack : घराबाहेर कपडे धुणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ला; महिलेचा मृत्यू

Sangamner News : साधारण २० ते २५ फूट शेतात ओढत नेले. हा प्रकार त्यांचा दीर प्रवीण अण्णासाहेब वर्पे यांनी पहिला. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेला. तरीही त्या बिबट्याने सोडले नाही.
Leopard Attack
Leopard AttackSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

संगमनेर (अहमदनगर) : सकाळच्या सुमारास घराबाहेर कपडे धुवत असलेल्या महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला करत शेतात ओढत नेले. बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. 

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निमगाव टेंभी येथील वर्पे वस्ती येथे सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. घराबाहेर कपडे धुवत असलेल्या संगीता शिवाजी वरपे (वय ४३) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांना साधारण २० ते २५ फूट शेतात ओढत नेले. हा प्रकार त्यांचा दीर प्रवीण अण्णासाहेब वर्पे यांनी पहिला. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर शेतात नेला. तरीही त्या बिबट्याने (Leopard Attack) सोडले नाही. परंतु काही अंतरावर बिबट्याने संगीत वर्पे यांना सोडले. मात्र यात गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना खासगी रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना मृत घोषित केले.

Leopard Attack
Hingoli Water Shortage : हिंगोलीत ऐन पावसाळ्यात पाणी बाणी; आठ दिवसांपासून जलवाहिनी बंद, सामाजिक कार्यकर्त्याने केला टँकरने पाणीपुरवठा

ग्रामस्थ संतप्त
हा घटनेनंतर परिसरात घाबरत पसरली असून ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. वन विभाग जे बिबटे पन्नास किलोमीटरच्या अंतरावर सोडत आहेत, हे जवळपास 250 किलोमीटरच्या अंतरावर सोडावेत. जेणेकरून ते परत येणार नाहीत. पंचक्रोशी निमगाव टेंभी, देवगाव, शिरपूर, जाकुरी या ठिकाणी कुणालाही हा बिबट्यांचा त्रास होऊ नये. परंतु जवळच्या परिसरात बिबटे सोडले जात असल्याने सर्व सामान्य शेतकऱ्याला शेती करणे सुद्धा मुश्किल झालंय. हा बिबट्या नरभक्षक झाला आहे. वनविभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com