पुणे, ता. ८ सप्टेंबर २०२४
Youth Beats up Security Guard Video: सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाण्यास मज्जाव केल्याने, संतापलेल्या डिलिव्हरी बॉयने आपले गावगुंडांचे टोळके आणून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला लाठीकाठी, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. या हल्ल्यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात रावेत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या व्हायरल होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये पुणे विल्हे या उच्चभृ सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला एका खाजगी कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपले गावगुंडांचं टोळकं आणून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात आता गाव गुंडांच्या टोळक्या विरोधात रावेत पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पुणे व्हिले सोसायटीमध्ये काल एक डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी आला होता. यावेळी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने डिलिव्हरी बॉयला सोसायटीच्या लिफ्टमध्ये जाण्यास मज्जाव केल्याने त्यांच्यामध्ये वाद झाला. याच वादातून संतापलेल्या डिलिव्हरी बॉयने आपलं गावगुंडांचं टोळंक आणून सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली होती. १० ते १२ जणांच्या टोळक्याने लाठीकाठी, लोखंडी रॉड आणि दगडाने सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला.
आधी डिलिव्हरी बॉय आणि सुरक्षा रक्षकामध्ये लिफ्टमध्ये वाद झाला, यावेळीही दोघांमध्ये मारहाण झाली. ज्यानंतर संतापलेल्या डिलिव्हरी बॉयने टोळक्याला बोलातून घेत बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, १०- १५ तरुण सुरक्षा रक्षकाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी हल्ला करत आहेत. या घटनेमुळे पुणे विल्हे सोसायटीचे नागरिकांमध्ये आणि सुरक्षारक्षकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. या प्रकरणात आता रावेत पोलिसांनीजवळपास दहा - पंधरा गावगुंडांच्या टोळक्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.