Delhi Metro Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Video : दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा! दोन पुरुष प्रवाशांत दे दणादण; फ्री स्टाईल हाणामारी VIDEO पाहा

Viral Video : सोशल मीडियावर खूप दिवसानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात दोन प्रवशांमध्ये तुफान हाणामारी होताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. याच दिल्ली मेट्रोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत व्हायरल होत असतात. कधी दिल्ली मेट्रोत महिलांमध्ये हाणामारी होते तर कधी कप्लसचे रोमान्स व्हिडिओ दिसून येतात. परंतू आता तर दिल्ली मेट्रोमध्ये चक्क दोन पुरुषांमध्ये हाणामारी झाली आहे. हा दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

याआधीही दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या विविध घटनांमुळे चर्चेत आली आहे. दिल्ली मेट्रोमध्ये काहीनाकाही घटना घडत असतात. आता देखील तुम्ही पाहू शकता दिल्ली मेट्रोमधला एक मारामारीचा जबरदस्त व्हिडिओ (Video)समोर आलाय. या व्हिडिओत दोन पुरुष प्रवासी एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसून येत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा आहे. या दिल्ली मेट्रोत अनेक प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र या दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro)दोन व्यक्ती मेट्रोच्या दरवाज्यावर उभे असतात. मात्र काही वेळानंतर एक व्यक्ती पायातली चप्पल काढून दुसऱ्या व्यक्तीला मारण्यास लागतो. मात्र तोही व्यक्तीही समोरच्या व्यक्तीला मारण्यास लागतो. यामध्ये मेट्रोमधील एक प्रवासी येतो आणि त्यांचे ही हाणामारी मिटवण्याचा प्रयत्न करतो.

दिल्ली मेट्रोमधील व्हिडिओ सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म एक्सवरील @gharkekalesh या अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २ मिलियनच्या पुढे व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर लाखोंच्या घरात लाईक्स आले आहेत . इतकेच नाही तर या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी विविध कमेंटसही केल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' महिलांनंतर आता पुरुषांची हाणामारी' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'दिल्ली मेट्रोमधील हे प्रकार कधीच थांबणार नाही.'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

SCROLL FOR NEXT